जिल्हा बॅंकेचे बडे थकबाकीदार राजेंद्र राऊतांच्या रडारवर; ‘आर्यन शुगरची येणेबाकी सोपलांकडून वसूल करणार का?'

राजेंद्र राऊत यांनी आर्यन शुगरसह सोलापूर जिल्ह्यातील ३५ थकबाकीदारांची माहिती सोलापूर जिल्हा बॅंकेकडे मागितली
Rajendra Raut
Rajendra RautSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बड्या थकबाकीदारांच्या विरोधात पुन्हा एकदा न्यायालयात जाण्याची तयारी बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे. माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्याशी संबंधित आर्यन शुगर कारखान्याची विक्री केल्यानंतर राऊत हे पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी सोलापूर जिल्हा बॅंकेचे बिगर शेती थकबाकीदार व त्यांच्याकडील रक्कम वसुलीसाठी केलेली कार्यवाही याबाबतची माहिती बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्याकडे मागितली आहे. ती माहिती हाती पडताच न्यायालयात धाव घेण्याची तयारी आमदार राऊतांनी सुरू केली आहे. (Rajendra Raut sought information about 35 defaulters including Aryan Sugar from Solapur District Bank)

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्‍यातील आर्यन शुगर या कारखान्याची विक्री सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेने नुकतीच बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांना केली आहे. या खासगी साखर कारखान्याचे मूळ कर्जदार हे बार्शी तालुक्यातील योगेश सोपल, सुधीर सोपल, उज्ज्वला सोपल, अलका सोपल व इतर आहेत. या साखर कारखान्याचा लिलाव घेणारे बजरंग सोनवणे यांना योगेश सोपल यांनी कारखान्याच्या शेजारील त्यांच्या मालकीची जमीनही विक्री केली आहे. त्याची रक्कम थकीत कर्जापोटी सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या बार्शी शहरातील मार्केट यार्ड शाखेत भरली आहे.

Rajendra Raut
निष्ठावंत असलो तरी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही : राजन पाटलांचा राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींना इशारा

या खरेदी खतामध्ये योगेश सोपल यांनी कर्जाची जबाबदारी स्वीकारल्याची वस्तुस्थिती आहे. हा कारखाना विक्री केल्यानंतर येणे बाकीची उर्वरित रक्कम सोपल कुटुंबीयांकडून वसूल करण्यासंदर्भात आपण कोणती कारवाई करणार आहात? याचीही माहिती आमदार राऊत यांनी मागितली आहे.

Rajendra Raut
राज्यपालांच्या आडून भाजपकडून सुरु आहे महाराष्ट्राचा अवमान

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे थकबाकीदार असलेल्या १ ते ३५ युनिटची माहिती, ही कर्जाची खाती एनपीएमध्ये गेल्यानंतरची थकबाकीची माहिती राजेंद्र राऊत यांनी बॅंकेच्या प्रशासकांकडे मागितली आहे. आर्यन शुगरची लिलावाद्वारे विक्री झाली असून लिलावाची संपूर्ण कागदपत्रे, लिलावासंदर्भात असलेल्या अटी व शर्तींची कागदपत्रेही आमदार राऊत यांनी मागितली आहेत. आर्यन शुगरमध्ये २०१५-१६ च्या हंगामात गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाचे २१ कोटी रुपये प्रलंबित असल्याची आठवणही आमदार राऊत यांनी या पत्राद्वारे करून दिली आहे.

Rajendra Raut
तिरूपती ट्रस्टची माघार : छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक ही शेतकऱ्यांची बॅंक आहे. ही बॅंक शेतकऱ्यांचीच राहिली पाहिजे. जिल्हा बॅंकेकडून माहिती मिळाल्यानंतर सहकार विभागाच्या संबंधित कार्यालयांकडे या संदर्भातील तक्रार करून न्याय मागितला जाणार आहे. त्यांच्याकडून न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचीही आम्ही तयारी ठेवली आहे, असे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com