Raju Shetty : साखर सम्राट पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर

टाकळीमियाँ ( ता. राहुरी ) येथे ऊस परिषदेमध्ये शेट्टी बोलत होते.
Raju Shetty
Raju ShettySarkarnama
Published on
Updated on

Raju Shetty : राज्यातील दोनशे साखर कारखान्यांनी काटा मारीत एक कोटी ३२ लाख टन ऊसावर डल्ला मारुन, ४६०० कोटींचा दरोडा घातला. साखर उतारा, मोलॅसेस, इथेनॉल यामध्ये चोऱ्या करून, ऊस दरात फटका देणारे दोनशे साखर सम्राट पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर आहेत. त्यांना साडेतीन कोटी ऊस उत्पादक शेतकरी वठणीवर आणतील. असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांनी केला.

टाकळीमियाँ ( ता. राहुरी ) येथे ऊस परिषदेमध्ये शेट्टी बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. रावसाहेब करपे होते. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालिंदर पाटील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संदीप जगताप, अनंत निकम, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, सुनील लोंढे, बाळासाहेब जाधव, अमृत धुमाळ, शामराव निमसे, उपसरपंच किशोर मोरे, सुभाष करपे, दत्तात्रय आढाव, संतोष चोळके, जितेंद्र शिंदे उपस्थित होते.

Raju Shetty
Video : तर भर मोर्चात मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव करणार : राजू शेट्टी

शेट्टी म्हणाले, "साखर उतारा चोरून, बिनशिक्क्याची साखर पोत्यांची मध्यरात्री कारखान्यातून वाहतूक होते. कोल्हापूर जिल्ह्यात २९०० ते ३३०० पर्यंत ऊस दर मिळतो. नगर जिल्ह्यात २१०० ते २४०० एवढा कमी ऊसदर मिळतो. महागाईचा आगडोंब उसळला. परंतु, दहा वर्षांपूर्वीचा ऊसदर आजही तोच आहे. व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला. तरच योग्य ऊसदर मिळेल. राजकीय विरोधक विखे-थोरात यांचे ऊसदर कमी देण्यावर एकमत असते."

Raju Shetty
Video: गहू निर्यातबंदीचा निर्णय मूर्खपणाचा ; राजू शेट्टी

"राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करून, त्यावर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे. मागील वर्षीची एफआरपी अधिक दोनशे रुपये; यंदाच्या वर्षी एकरकमी एफआरपी अधिक तीनशे पन्नास रुपये मिळावेत. (स्व.) गोपीनाथ मुंडे महामंडळातर्फे राज्यातील नऊ लाख ऊस तोडणी मजुरांची नोंदणी करावी. शेतकरी, ऊस तोडणी मजुरांची लूटमार करणारे "मुकादम" वगळून महामंडळातर्फे साखर कारखान्यांना मजूर पुरवावेत. अशा विविध मागण्यांसाठी सात नोव्हेंबर रोजी पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयावर शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा होईल."

"शासनाने मागण्या मान्य केल्या नाही. तर, सतरा व अठरा नोव्हेंबर रोजी राज्यभरात ऊस वाहतूक बंद करून, दोन दिवस साखर कारखाने बंद पाडले जातील. शेतकऱ्यांनी एकजुटीची ताकद दाखवावी." असे आवाहन शेट्टी यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com