Ram Shinde : मी अडीच वर्षातच पुन्हा आलो..

भाजपचे विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे ( Ram Shinde ) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|
Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|
Published on
Updated on

Ram Shinde : भाजपचे विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे ( Ram Shinde ) हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात. फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईल', हे वाक्य प्रसिद्ध झाले होते. तेच वाक्य कर्जत-जामखेडमधील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी वापरले. औचित्य होते. कुकडीचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. काळे यांच्या हस्ते येसवडी तलावातील जलपूजनाचे.

या जलपूजन कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, उपाध्यक्ष पांडूरंग भंडारे, शहराध्यक्ष एकनाथ धोंडे, दत्ता गोसावी, सुनील काळे, सोयब काझी, तात्यासाहेब माने, बंडा मोढळे, योगेश शर्मा, अंकुश राऊत, जयदीप पिसे, उपसरपंच कृष्णा मरळ, सुभाष सामसे, हिरामण उकिरडे, हनुमंत केदारी, तुषार पिसे, दगडू कांबळे, संदीप कांबळे, अॅड. हरिश्चंद्र राऊत, विलास काळे, रविंद्र दंडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|
Video : राम शिंदे यांचे जल्लोषात स्वागत

प्रा. राम शिंदे म्हणाले, लोकांना वाटले आत्ता मी काही पुन्हा येणार नाही, मात्र मी अडीच वर्षातच पुन्हा आलो..! मी नसल्याने गेली अडीच वर्षे कर्जत तालुक्याला कुकडीचे पाणी मिळाले नाही, आत्ता मी आलो आणि पाणीही आले. अडीच वर्षाचा पाण्याचा अनुशेष भरून काढणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, की पंचवीस वर्षे येसवडीकरांचे तलाव भरण्याचे अधुरे स्वप्न यंदा पूर्ण झाले. कुकडीच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने येसवडी तलाव पूर्ण क्षमतेने पहिल्यांदाच भरला. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पाण्याची अडचण येणार नाही. यावेळी येसवडी ग्रामस्थांचा सत्कार आणि चहा-पान घेत आमदार शिंदे यांनी ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.

Vidhan Parishad | BJP| Ram Shinde|
वनवास संपला : राम शिंदेंना मंत्रीपदाचे वेध

तुमच्या लक्षात राहील...

काळे साहेब..., पाण्याचे पूजन तुम्हीच करा.., म्हणजे हा तलाव तुमच्या लक्षात राहील. आपल्याला येथे नेहमी पाणी द्यायचे आहे, असे सांगत आमदार राम शिंदे यांनी कार्यकारी अभियंता काळे यांना पाण्याचे पूजन करायला लावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com