राम शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षांत कर्जतच्या जनतेचा अपेक्षाभंग झाला...

माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप ( BJP ) व मित्र पक्षांनी आज कर्जतमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
Ram Shinde while giving speech
Ram Shinde while giving speechSarkarnama
Published on
Updated on

कर्जत ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात कर्जत नगरपंचायतीचा समावेश आहे. माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने ( BJP ) आज कर्जतमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. Ram Shinde said, in the last two years, the people of Karjat have been disappointed ...

आज येथे नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप व मित्रपक्षांच्या वतीने मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. कर्जतच्या रस्त्यांवर भाजपने आपली शक्ती दाखवून दिली. या वेळी झालेल्या जाहीर सभेली माजी मंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, युवा नेते सुवेंद्र गांधी, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सरचिटणीस सचिन पोटरे, सह निरीक्षक बाळासाहेब महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष अशोक खेडकर, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, शहराध्यक्ष वैभव शहा, युवा नेते गणेश क्षीरसागर, सुनील यादव, दादा सोनमाळी, काका धांडे, रिपाई तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, मनीषा वडे, डॉ. कांचन खेत्रे, राखी शहा, विनोद दळवी, अनिल गदादे उपस्थित होते.

Ram Shinde while giving speech
कर्जतमध्ये दोन वर्षांनी पुन्हा राम शिंदे विरुद्ध रोहित पवार सामना

राम शिंदे म्हणाले, कर्जतमधील जनता स्वाभिमानी आहे. ही जनता दबाव आणि दहशतीच्या राजकारणाला झुगारून या निवडणुकीत भाजप सह मित्रपक्षांना नक्कीच स्पष्ट बहुमत देईल, असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, भाजप सत्तेच्या काळात गट-तट पक्षभेद न पाहता शहराचा सर्वांगीण विकास साधला. मतदारसंघात दळणवळण सुविधेसाठी गावे, वाडया-वस्त्या पक्क्या डांबरी सडकेने जोडल्या, शहरासाठी 151 कोटी रुपयांचा विकासनिधी देत सर्वांगीण विकास साधला. शब्द पाळणारा आणि कृतीत उतरवण्यासाठी या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा निवडून द्या, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

Ram Shinde while giving speech
राम शिंदे म्हणाले, त्यांचा महाराष्ट्र बंदचा प्रयोग फसला...

साहेबांचा नातू म्हणून त्यांनीं निवडणुकीत मोठी स्वप्न दाखविली, मागील दोन वर्षांत कर्जतच्या जनतेचा पूर्णपणे अपेक्षाभंग झाला आहे. 28 हजार युवकांचे लग्न आणि आठ हजार युवकांच्या नोकऱ्यांचे काय झाले? याचे उत्तर त्यांनी समोरासमोर द्यावे असे आव्हान माजीमंत्री शिंदे यांनी दिले.

Ram Shinde while giving speech
राम शिंदे म्हणतात, ठाकरे सरकार शेतकरीद्रोही

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी संघर्ष करण्याचे बाळकडू माझे आजोबा लोकनेते बाळासाहेब विखे यांच्याकडून मिळाले आहे. मात्र राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी कुणी दबाव आणि दहशतीचे राजकारण करीत असले तर त्यांचा माज उतरवू असा टोला रोहित पवार यांचे नाव न घेता डॉ. विखे पाटील यांनी लगावला. ही निवडणूक माझ्या वा राम शिंदेंच्या प्रतिष्ठेची नसून कर्जतकरांच्या विश्वासाची आणि स्वाभिमानाची लढाई आहे. यास ते पात्र ठरतील.

या वेळी जिल्हाध्यक्ष मुंडे, सुवेंद्र गांधी, अल्लाउद्दीन काझी, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर, सचिन पोटरे, शशिकांत पाटील, वैभव शहा आदींची भाषणे झाली. सचिन पोटरे यांनी प्रास्तविक केले. उमेश जेवरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुनील गावडे यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com