राम शिंदेंचा रात्रभर थंडीत मंदिरासमोरच मुक्काम

संतप्त झालेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) बळाचा वापर झाल्याचा आरोप करत कर्जत मधील गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन सुरू केले.
माजी मंत्री राम शिंदे गोदड महाराज मंदिरा समोरच झोपले

माजी मंत्री राम शिंदे गोदड महाराज मंदिरा समोरच झोपले

सरकारनामाम

Published on
Updated on

कर्जत ( अहमदनगर ) : कर्जत नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. या निवडणूक कार्यक्रमात काल ( सोमवार ) उमेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपच्या शहराध्यक्षाच्या पत्नीसह भाजप एका उमेदवाराने अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतले. संतप्त झालेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP ) बळाचा वापर झाल्याचा आरोप करत कर्जत मधील गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन सुरू केले. राम शिंदे हे कडाक्याच्या थंडी गोदड महाराज मंदिरासमोरच मुक्कामाला राहिले. त्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. Ram Shinde's overnight stay in front of the temple

आमदार रोहित पवार यांच्या निवडणुकीतील दडपशाही केल्याचा आरोप करीत मौन आंदोलन केले आहे. हे आंदोलन रात्रभर सुरू असून या निषेधार्थ आज सकाळी अकरा वाजता भाजपतर्फे शहरभर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. शिंदे व त्यांचे कार्यकर्ते गोदड महाराज मंदिरासमोर थंडीतच झोपले. काहींनीतर रात्र तेथेच जागून काढली. राम शिंदेंच्या हस्ते पहाटे गोदड महाराज यांची काकड आरती झाली.

<div class="paragraphs"><p>माजी मंत्री राम शिंदे गोदड महाराज मंदिरा समोरच झोपले</p></div>
नगरपालिका निवडणुकीत कर्जतमध्ये राजकीय नाट्य आणि राम शिंदे संतापले; पाहा व्हिडिओ

जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ म्हणाले येथे आमदार रोहित पवार दडपशाही करून दबाव आणून उमेदवारांना माघारी घेण्यास सांगत आहेत. माजी मंत्री राम शिंदे हे मंत्री असताना देखील लोकशाही मार्गाने गेल्यावेळी निवडणूक लढविली. आम्ही त्यांच्या विरोधात लढलो मात्र त्यांनी कधीही दडपशाही वा दबाव आणला नाही. येथे बिहार झाले की काय?, असा आरोपही त्यांनी केला.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे म्हणाले की, येथे लोकशाहीचा खून झाला आहे. प्रशासन अधिकारी त्यांच्या धाकात आणि दडपणाखाली आहेत,त्या मुळे माजी मंत्री राम शिंदे व आम्ही सर्व जनतेच्या दरबारात व संत गोदड महाराजाकडे न्याय मागत आहोत.

<div class="paragraphs"><p>माजी मंत्री राम शिंदे गोदड महाराज मंदिरा समोरच झोपले</p></div>
राम शिंदे असे का वागत आहे, हे कळत नाही.. ; पाहा व्हिडिओ

दादा सोनमाळी म्हणाले, येथे आमदार व त्यांचे कार्यकर्ते हे भाजपच्या उमेदवार,कार्यकर्त्यांना धमकावत आहेत तसेच आमिष दाखवून किंवा बदली करू यासह विविध धमक्या देत आहेत.त्यामुळे ही निवडणूक रद्द करून पुन्हा लोकशाही मार्गाने निवडणूक घ्यावी,यात निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा.

या वेळी काका धांडे, ज्ञानदेव लष्कर, गणेश क्षीरसागर, संजय भैलूमे, तारक सय्यद, अनिल गदादे, दत्ता कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com