Ramraje Naik Nimbalkar News : माढा लोकसभेसाठी अजितदादा गट आक्रमक, रामराजेंनी घेतली आग्रही भूमिका

Satara constituency : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही परिस्थितीत माढा मतदारसंघ हा अजित पवार गटाकडेच कसा राहील, यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Madha Loksabha News : माढा लोकसभा मतदारसंघावरून सध्या फलटणच्या दोन निंबाळकरांत रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महायुतीत भारतीय जनता पक्षाच्या BJP नेत्यांची अडचण झाली आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा माढा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. कोणत्याही परिस्थितीत माढा मतदारसंघ हा अजित पवार Ajit Pawar गटाकडेच कसा राहील, यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी येत्या बुधवारी 6 तारखेला मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची NCP बैठक होणार आहे. Ajitdada group aggressive for Madha Lok Sabha Ramraje took a strong stand

माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात आहे, पण मागीलवेळी तेथे भाजपने केलेल्या खेळीमुळे खासदार रणजितसिंह निंबाळकर Ranjitsingh Nimbalkar हे निवडून आले. गेल्या पाच वर्षांत त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावल्याचे सांगितले आहे. तसेच या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील दुष्काळ हटविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. अशातच आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शड्डू ठोकला आहे Madha Lok Sabha Ramraje took a strong stand

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramraje Naik Nimbalkar
Satara Politics : आमदार गोरेंचं ठरलं! फलटणमध्ये जाऊन रामराजेंना भिडणार

मतदारसंघ कोणाला...

पण, महायुती हा मतदारसंघ कोणाला सोडला जाणार हे निश्चित झालेले नाही. महायुतीच्या दुसऱ्या यादीत याबाबत सर्व काही स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी माढा मतदारसंघावरून भाजप व अजित पवार गट राष्ट्रवादी (NCP) यांच्यात वाद होण्याची चिन्हे आहेत. फलटणचे नेते व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळावा, यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची Congress येत्या बुधवारी (ता. ६) मुंबईत सकाळी अकरा वाजता बैठक होत आहे. या बैठकीत माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेण्याबाबत चर्चा होणार आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar कोणते दबाव तंत्र महायुतीत वापरणार याची उत्सुकता आहे.

Edited By : Rashmi Mane

R

दरम्यान, यासंदर्भात रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar म्हणाले, माढा मतदारसंघ अजित पवार गटाकडे यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानंतर उमेदवारचा विषय उपमुख्यमंत्री अजित पवार हे ठरवतील. अजितदादा हे शिस्तप्रिय आहेत. या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकत आहे. या मतदारसंघात तुम्हाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आव्हान वाटत नाही का, या प्रश्नावर रामराजे म्हणाले, पवारसाहेबांच्या गटाचे आम्हाला आव्हान वाटत नाही. शरद पवारांविषयी आदर आणि प्रेमही आहे. त्यांच्या राष्ट्रवादीचा विषय माझ्यादृष्टीने संपलेला आहे. आमच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. आता जे काही होईल ते होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या सहा तारखेला अजित पवार गटाची बैठक मुंबईत होत असून या बैठकीत आम्ही माढा लोकसभेसाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ramraje Naik Nimbalkar
Sangli Loksabha 2024 : सांगलीची जागा सोडणार नाही! काँग्रेस ठाम; मुंबईत आज...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com