Whatsapp स्टेटसमधून रामराजेंचा आमदार गोरेंना चिमटा, दिलं 'हे' उत्तर

Ramraje Naik Nimbalkar : रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या नातींचा फोटो स्टेटसला पोस्ट करुन विनोदी शैलीत टोला लगावला.
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Goresarkarnama
Published on
Updated on

सातारा :आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी म्हसवड एमआयडीसीवरुन रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन निशाणा साधला होता. त्याला त्यांच्याच भाषेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसमध्ये आमदार गोरेच्या मार्गदर्शनानुसार नातींबरोबर..असे सूचक उत्तर दिले आहे.

जयकुमार गोरे यांनी रणदुल्लाबाद येथील शेतकऱ्यांसोबत घेत म्हसवड एमआयडीसीच्या मुद्यावरुन रामराजे निंबाळकर यांच्यावर थेट निशाणा साधला होता.

आमदार गोरे यांनी म्हटले होते की, म्हसवड येथे एमआयडीसी मंजूर असताना रामराजेंनी तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना हाताशी धरत ही एमआयडीसी कोरेगावात नेली. ती केवळ त्यांनी बगलबच्चे यांच्या नावावर कवडीमोल दराने खरेदी केलेल्या शेकडो एकर जमीनीसाठीच. हा सध्याचा प्रकार पाहता आता रामराजे यांचे वय झालं आहे. त्यांची बुध्दी काम करायचं बंद झाली आहे. या वयात त्यांनी डोक्याला अन त्यातल्या मेंदूला त्रास देवू नये. निवृत्तीच्या वयात विश्रांती घ्यावी, त्यांनी आपली फजिती करुन घेवू नये, असा सल्ला यांनी दिला होता. या मुद्याला रामराजे नाईक निंबाळकर यांनीही रविवारी मोबाईल आपल्या नातींचा फोटो स्टेटसला पोस्ट करुन आमदार गोरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नातींबरोबर विश्रांती घेत आहे, असा विनोदी शैलीत टोला लगावला.

Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Amit Shah यांच्या उपस्थितीत शिवसेनेला शह देण्यासाठी ठरणार रणनीती ; मनसेसोबत आघाडी होणार ?

या सगळ्या परिस्थितीत माजी सभापती रामराजे यांनी मात्र, हा विनोदाचा भाग आहे. राजकारणात या गंमती जंमती होतच असतात, असे सांगून आणखी एक विनोद केला आहे.

दरम्यान, म्हसवड एमआयडीसी वरून सध्या रामराजे आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यात वाद पेटला आहे. आता या वादात शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी उडी घेतली आहे. काल त्यांनी पत्रक काढून त्यांना टोला लगावला आहे. "आम्हाला माण तालुक्याचा विकास करायचा असून म्हसवडला मंजूर एमआयडीसी जर कोणी कोरेगावला नेण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. माण तालुक्याच्या अस्मितेसाठी मंत्रालयावर शिवसेनेच्यावतीने विराट मोर्चा काढून दाखवून देऊ, असा इशारा शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी दिला आहे. दरम्यान,विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे आणि आमदार जयकुमार गोरे हे दोघेही एकाच माळेचे मणी असून लोकांना वेडे बनवण्याचा दोघांचा व्यवसाय आहे," असाही टोला त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com