Swabhimani Shetkari Sanghatana Dispute : राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी'तील वाद आणखी चिघळणार?

Ravikant Tupkar News : रविकांत तुपकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या भूमिकेवरच नाराजी व्यक्त केली.
Raju Shetty, Ravikant Tupkar News
Raju Shetty, Ravikant Tupkar NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्येही बंडाचे धुमारे फुटताहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी थेट संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवले आहे. शेट्टींच्या संघटनेचा खरा चेहरा आणि आवाज असलेले तुपकरच आता नाराज असल्याने स्वाभिनामीत नवे नाट्य घडू शकते.

रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) नाराज आहेत. हा वाद विशेष महत्वाचा नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले होते. मात्र, वाद महत्त्वाचा नाही म्हणणे चुकीच आहे. माझा आक्षेप नेतृत्वाची कार्यपद्धती आणि भूमिकेबद्दल असल्याचे म्हणत तुपकरांनी थेट राजू शेट्टी यांच्यावरच निशाणा साधल्याने वाद उफाळण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे.

Raju Shetty, Ravikant Tupkar News
Fadnavis Offer To Thopte : संग्राम थोपटेंसाठी फडणवीसांची ‘सत्यजित तांबे लाईन’; म्हणाले, ‘नाही तर आम्हाला न्याय द्यावा लागेल’

तुपकर संघटनेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. तुपकर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रभाव आहे. आक्रमक शेतकरी नेते म्हणूनही त्यांची राज्यभर ओळख आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यानंतर स्वाभिमानी सावरण्यात तुपकर यांचा मोठा वाटा आहे. आता तेच तुपकर नाराज असल्याची चर्चा आहे, तशा प्रतिक्रियाही त्यांनी दिल्या आहेत.

संघटनेतील हा वाद महत्त्वाचा नाही असे सांगत शेट्टी यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांचा वाद आहे. पक्षाची शिस्तपालन समिती यावर बैठक घेईल, त्यात तुपकर आणि त्यांच्याशी वाद असलेले युवा आघाडीचे प्रशांत दिनकर यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल त्यानंतर हा वाद मिटेल, अशी भूमिका शेट्टी यांनी घेतली होती.

Raju Shetty, Ravikant Tupkar News
Monsoon Session News : शहांनी विरोधकांना ठणकावले : दिल्ली सेवा विधेयकावरून लोकसभेत गोंधळ

मात्र, तुपकरानी राजू शेट्टी यांचे म्हणणे फेटाळून लावले आहे. माझा वाद स्थानिक पदाधिकाऱ्यांशी नाही तर तो पक्ष नेतृत्वाशी आहे. पक्ष नेतृत्वाची म्हणजेच राजू शेट्टी यांची कार्यपद्धती आणि भूमिका यावर आक्षेप आहे. हा वाद महत्वाचा नाही म्हणणे चुकीच आहे माझ्या भूमिकेचे गांभीर्य कमी करण्यासाठी शेट्टी अस बोलत असल्याची प्रतिक्रिया तुपकर यांनी दिली. आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेही तुपकर यांनी स्पष्ट केल्यामुळे संघटनेत सगळे काही अलबेल नसल्याचे बोलले जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com