Chandrakant Patil : कर्मवीरांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना 'रयत'नेही सुनावलं

आज महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर दिसतो आहे त्याला अण्णांचे स्वावलंबी शिक्षणाचे हे तत्वच कारणीभूत आहे.
Chandrakant Patil :  कर्मवीरांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना 'रयत'नेही सुनावलं

Rayat Shikshan Sanstha Letter to Chandrkant Patil : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि तेव्हापासून राज्यभरात त्याचे पडसाद उमटू लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. राज्यभरातील पाटील यांच्याविरोधात वातावरण तापले होते. त्यातच काल (१० डिसेंबर) सायंकाळी ते पुणे दौऱ्यावर असताना एका तरुणाने त्यांच्यावर शाईफेक केली. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, रयत शिक्षण संस्थेने एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. याचवेळी या पत्रात त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यावेळी शिक्षणासाठी पैसा कसा उभा केला, याची इंतभूत माहिती दिली आहे. इतकेच नव्हे तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना भीक न मागता, कमवा आणि शिका, स्वावलंबी होऊन शिक्षण घ्या असा मंत्र दिला. 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे या संस्थेचं ब्रीदवाक्य कर्मवीरांनी दिलं आहे. विशेष म्हणजे येथील कमवा आणि शिका योजनेची जागतिक पातळीवर दखल घेतल्याचे रयत शिक्षण संस्थेने आपल्या पत्रात सांगितलं आहे.  आमदार अमोल मिटकरी यांनी हे पत्र ट्विटरवरुन शेअर केले आहे.

वाचा, काय लिहीलं आहे रयत शिक्षण संस्थेने या पत्रात?

महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील गोर-गरीब, डोंगर दऱ्यांमध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना १०३ वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे एकमेव साधन आहे ही कर्मवीरांची दूरदृष्टी होती. म्हणून त्यांनी या मुलांच्या शिक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण केले किर्लोस्कर, ओगले, कूपर या कंपनीमध्ये कर्मवीरांनी जे काम केले त्या माध्यमातून मिळालेले उत्पन्न, त्यांच्याकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातील उत्पन्न, किलोस्कर कंपनीतील अण्णांचे शेअर्स, आई वडीलांच्या नावे असलेली शिल्लक रक्कम, पत्नी सौ. लक्ष्मीबाई यांच्या माहेरकडून मिळालेले १०० तोळे सोने, मंगळसूत्र सुद्धा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च केले.

विद्यार्थ्यांनी भीक मागून शिकण्यापेक्षा स्वावलंबनाने, स्वकष्टाने आपले शिक्षण पूर्ण करावे, हे कर्मवीरांचे शैक्षणिक तत्वज्ञान होते यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ' कमवा व शिका ' ही अभिनव योजना राबविली. आज या योजनेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. म्हणूनच " स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद ' हे कर्मवीरांनी संस्थेचे ब्रीद घेतले.

कर्मवीरांच्या या कार्याला समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन लोकसहभागातून ही शैक्षणिक चळवळ अधिकाधिक व्यापक केली. बहुजन समाजातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी समाजाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. या माध्यमातून कोट्यावधी मुलांना शिक्षण मिळाले. आज महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर दिसतो आहे त्याला अण्णांचे स्वावलंबी शिक्षणाचे हे तत्वच कारणीभूत आहे, असे म्हटले तर अनुचित ठरणार नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज हे कर्मवीरांचे आदर्श होते. याच कालखंडात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा कर्मवीरांना मोठे सहकार्य लाभले. म्हणून शानाने समृद्ध असलेली पिढी कर्मवीर निर्माण करू शकले.

या सर्व पार्श्वभूमीवर ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काल केलेले विधान अत्यंत दुदेवी आहे. त्याचा संस्थेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.

रयत शिक्षण संस्था , सातारा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com