Ahmednagar News : अजितदादांमुळे निर्णय प्रक्रियेला गती; आमचा संसारही उत्तम चाललाय : विखे पाटील मोजक्या शब्दांत नेमके बोलले

Ahmadnagar Politics : मागील अडीच वर्षात ठप्‍प झालेली विकासाची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे जाण्‍यास मदतच झाली आहे.
Ajit Pawar, Radhakrishna Vikhe Patil News
Ajit Pawar, Radhakrishna Vikhe Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

(राजेंद्र त्रिमुखे)

Radhakrishna Vikhe Patil News : उपमुख्‍यमंत्री म्‍हणून अजीत पवार सरकारमध्‍ये सहभागी झाल्‍याने सरकारच्‍या निर्णय प्रक्रियेला अधिक गती आली आहे. मागील अडीच वर्षात ठप्‍प झालेली विकासाची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे जाण्‍यास मदतच झाली आहे. आमचा संसार आता उत्‍तम चालला असल्‍याचे राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सांगितले.

पवार परिवार आणि विखे परिवारातील राजकीय वैर महाराष्ट्राला परिचित आहे. नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत 1991 ला (स्व) बाळासाहेब विखे विरुद्ध यशवंतराव गडाख निवडणूक आणि त्यानंतर त्यांच्यात झालेली न्यायालयीन लढाई चांगलीच गाजली होती. त्या वेळी सुरू झालेला पवार-विखे राजकीय संघर्ष 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंसाठी जागावाटपातही दिसून आला.

Ajit Pawar, Radhakrishna Vikhe Patil News
BJP News : मोदींच्या 'घर चलो' अभियानाचा नारळ नागपुरात फुटला

पवारांनी ना काँग्रेसला (Congress) जागा सोडली ना सुजय विखेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली. अखेर सुजय विखे भाजपकडून खासदार झाले. तर विधानसभेला राधाकृष्ण विखेही भाजपवासी (BJP) झाले. आता राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर बदलत्या राजकीय परीस्थितीत विखे आणि अजित पवार एकत्र मंत्रिमंडळात आहेत. या पार्श्वभूमीवर विखेंनी केलेली टिपण्णी महत्वपूर्ण आहे.

दरम्यान, यावेळी इर्शाळवाडी येथील घटनेवरीही विखे पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, इर्शाळवाडीतील घटना अतिशय दुर्दैवी असून, या आपत्‍ती मधील नागरीकांना सर्वतोपरी मदत करण्‍याची भूमिका राज्‍य सरकारने घेतली आहे. या संकटात पशुधन दगावलेल्‍या पशुपालकांनाही मदत करण्‍याबाबत शासन कमी पडणार नाही, अशी ग्‍वाही त्यांनी दिली.

Ajit Pawar, Radhakrishna Vikhe Patil News
Shrikant Shinde News : मोदी-शहांच्या भेटीने बळ चढलेल्या श्रीकांत शिंदेंच्या शब्दांना धार अन् उद्धव ठाकरे घायाळ

इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याने येथील रहिवाश्यांची घरे पूर्ण नष्ट झाली आहेत. यामध्ये आतापर्यंत २९ जणांचा जीव गेला आहे. या घटनेमध्ये पशुधनही दगावले आहे. घटनेनच्या तिसऱ्या दिवशीही मदत कार्य सुरू असले तरी परिसरात मोठा पाऊस कोसळत असल्याने अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना विखे पाटील यांनी, पशुसंवर्धन विभागाच्‍या आधिका-यांना याबाबत सर्वतोपरी सुचना देण्‍यात आल्‍या असल्याचे सांगितले.

आपत्‍तीमध्‍ये दगावलेल्‍या जनावरांची संख्‍या समोर आल्यानंतर या पशुपालकांना कोणत्‍या प्रकारची मदत करता येईल, याचा विचार शासन निश्चित करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. लम्पी संकटात केलेल्‍या मदतीप्रमाणेच या नैसर्गिक संकटातही सरकार पशुपालकांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्‍याचे विखे यांनी यावेळी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com