देवेंद्र फडणवीसांना आलेल्या नोटिशीबाबत जयंत पाटील म्हणाले...

महाविकास आघाडी सरकार अशाप्रकारचे सुडाचे राजकारण शंभर टक्के करणार नाही
Devendra Fadnavis-Jayant Patil
Devendra Fadnavis-Jayant PatilSarkarnama

मुंबई : पोलिसांच्या बदल्यांमधील घोटाळा प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. त्यावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुडाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप भाजप नेत्यांकडून हेात आहे. त्याला आघाडीच्या नेत्यांकडून उत्तर दिले जात आहे. या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची प्रतिक्रिया आली आहे. (Regarding the notice of Devendra Fadnavis, Jayant Patil said...)

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी कारवाई सूडभावनेची आहे, असे आरोप राज्य सरकारवर होत आहे. त्या आरोपाचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खंडन केले आहे. महाविकास आघाडी सरकार अशाप्रकारचे सुडाचे राजकारण शंभर टक्के करणार नाही, असा दावाही त्यांनी या वेळी बोलताना केला.

Devendra Fadnavis-Jayant Patil
फडणवीसांना त्रास द्याल; तर धडा शिकवला जाईल : भाजप आक्रमक

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी फडणवीसांना आलेल्या नोटिशीबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी केवळ माहिती घेण्यासाठी बोलवले असावे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई करून त्यांना अडचणीत आणण्याचा हेतू राज्य सरकारचा मला तरी दिसत नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis-Jayant Patil
चक्क ग्रामपंचायत सदस्यानेच घेतले अफूचे पीक!

चंद्रकांतदादा म्हणतात, हा तर चोर सोडून...

दरम्यान, याच प्रकरणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला होता. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बदल्यांतील घोटाळाप्रकरणी CRPC 160 अन्वये दिलेली नोटिस म्हणजे चोर सोडून संन्याशाला...असा हा प्रकार आहे. विरोधी पक्षनेते म्हणून असलेल्या विशेषाधिकारांबाबत या सरकारला, राजशिष्टाचार विभागाला काहीच माहिती नाही? की कायदे पाळायचेच नाहीत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Devendra Fadnavis-Jayant Patil
आमदार संजय शिंदे अध्यक्ष असताना झेडपीत ‘रात्रीस खेळ चाले’

विशेषाधिकार असूनही चौकशीला सामोरे जाण्याच्या, प्रश्नांना उत्तरे देण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. महाविकास आघाडी सरकार मनमानी करताना आम्ही मात्र लोकशाही मूल्ये जपतो, हेच यातून स्पष्ट होते आहे. मुंबईनंतर पुणे पोलिसांनीही अशीच नोटिस काढल्याचं समजतंय. अरे, तुम्ही असं सत्य झाकू शकाल? हे प्रकरण न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यावरही महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीस यांना चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकवू शकेल? किती बौद्धिक दिवाळखोरी? आम्ही लोकशाहीसाठी सहकार्य करू तसेच रस्त्यावरही उतरू. चौकशीसाठी बोलावून देवेंद्र फडणवीस यांना नाहक त्रास दिला, तर महाविकास आघाडी सरकारला योग्य धडाही निश्चितच शिकवू, हे नीट लक्षात ठेवा, असा इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com