महसूलमंत्री विखेंची शेरोशायरी कोणासाठी... रंगली खुमासदार चर्चा

कव्वाली कार्यक्रमात गेलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी प्रसंगाचे औचित्य साधून शेर पेश केला.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilParesh Kapse

Radhakrishna Vikhe Patil : संगमनेरात गुरुवारी रात्री झालेल्या एका उत्सवातील कव्वालीच्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी प्रसंगाचे औचित्य साधून ‘कभी खुद को मेरे प्यार मे भुलाकर देख.. दुश्‍मनी अच्‍छी नही, मुझे दोस्‍त बनाकर देख’ हा शेर पेश करुन नक्की कोणाला दोस्तीचं आवतनं दिलं याची खुमासदार चर्चा संगमनेरात रंगली आहे.

एका पक्षातील सहकारी ते विरोधी पक्षातील पारंपरिक राजकीय विरोधक असलेले राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात यांच्यामधील विळ्या भोपळ्याचे सख्य सर्वश्रृत आहे. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडीत नाहीत. किंबहुना यात विखे पाटील अधिकच आक्रमक असतात.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : मागील अडीच वर्षात राज्याचा विकास 25 वर्षांनी मागे गेला

या पार्श्वभुमीवर मागील काही दिवसांत निळवंडेच्या श्रेयवादावरुन आरोप प्रत्यारोपाची राळ उडते आहे. त्यातही संगमनेर तालुक्यातील शिर्डी विधानसभा मतदार संघातील गावांच्या समावेशामुळे विखे यांचा संगमनेरशी संपर्क वाढला आहे. थोरातांचे संगमनेरातील राजकीय विरोधक कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विखेंना पाचारण करतात. गुरुवार ( ता. 22 ) रोजी शहरातील ख्वाजापीर मोहंम्मद सादीक दर्गाह ट्रस्टच्या उर्स कमिटीच्यावतीने आयोजित केलेल्या कव्वाली कार्यक्रमाला रात्री उशिरा विखे पाटील यांनी हजेरी लावीत दर्ग्याचे दर्शन घेवून चादर चढवली. त्यानंतर कव्वालीचा आनंदही घेतला.

Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil : जमीन वाटपात गैरव्यवहार करणाऱ्यांना सोडणार नाही

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दोन शब्द बोलताना विखे यांनी हिंदीतून केलेल्या भाषणात हा उत्सव संगमनेरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक असून, विखे परिवाराने ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यातून दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांशी जोडलेला ऋणानुबंध कायम राहिल्याकडे लक्ष वेधले. त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली तेव्‍हा सुध्‍दा सर्व समाज बांधवांनी त्‍यांना पाठबळ दिले. या दर्ग्याचे दर्शन घेतल्‍यानंतर एक नवी उमेद व प्रेरणा मिळत असल्याचे नमूद केले.

ट्रस्टचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष निसार धांदल, उपाध्यक्ष निसार शेख, विश्वस्त जावेद जहागिरदार, शेख हाजी फजलू रहेमान, शम्मू हाजी लाला बेपारी, शरीफ शेख, रउफ शेख, एजाज देशमुख यांच्यासह उद्योगपती मनिष मालपाणी, भाजपचे शहराध्‍यक्ष श्रीराम गणपुले, तालुका अध्‍यक्ष डॉ. अशोक इथापे, अमोल खताळ, सतीष कानवडे, किशोर नावनंदर, राहुल भोईर यांच्‍यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com