Robert Vadra : नरेंद्र मोदींची लोकांना भीती वाटतेय...

उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज टीका केली.
Robert Vadra
Robert VadraSarkarnama
Published on
Updated on

Robert Vadra : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे भारत जोडो अभियान अंतर्गत देशभर पायी फिरत आहेत. त्यांच्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे असताना त्यांचे मेहुणे उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज टीका केली.

आज त्यांनी शिर्डी येथे जाऊन साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, अविनाश दंडवते, सुमित शेळके, माजी नगरसेवक सचिन चौगुले, शहर उपाध्यक्ष अमृत गायके, श्रीकांत अहिरे आदी उपस्थित होते.

Robert Vadra
प्रियंका गांधींना महासचिव केले, आता रॉबर्ट वाड्रा यांना कोषाध्यक्ष करा - सरोज पांडेचा कॉंग्रेसला टोला

रॉबर्ट वाड्रा म्हणाले, माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे देशाची प्रगती आणि नव्या तंत्रज्ञाना बाबतचे स्वप्न ते पूर्ण करतील. केंद्र सरकारच्या अपयशाबाबत बोलतो म्हणून आम्हाला ट्रोल केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून बोलणार ही बातमी कळताच लोकांना भीती वाटते, अशी टीका त्यांनी केली.

Robert Vadra
रॉबर्ट वाड्रा लोकसभा निवडणूक लढविणार..

वाड्रा पुढे म्हणाले, की आम्ही केंद्र सरकारच्या अपयशा बाबत बोलतो, म्हणून आम्हाला ट्रोल केले जाते. राहुल, प्रियंकासह आम्ही त्याची फिकीर न करता एकत्र राहून बोलत राहू. राहुल गांधी या पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळतो. लोक त्यांच्या सोबत आहेत. आता बदल होईल असा विश्वास वाटतो. स्वर्गीय राजीव गांधी यांच्या सोबत लोक होते. त्यांनी नवे तंत्रज्ञान आणले, त्यांचे अधुरे स्वप्न राहुल नक्की पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com