Rohit Pawar Vs Sujay Vikhe : नगरमध्ये 'एमआयडीसी'वरून रणकंदन ? सुजय विखे - रोहित पवारांना वेगवेगळा न्याय

Ahemednagar MIDC : विखे पाटलांची एमआयडीसीला मान्यता तर पवारांच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष
Sujay Vikhe Patil, Rohit pawar
Sujay Vikhe Patil, Rohit pawarSarkarnama

Ahmednagar Political News : आमदार रोहित पवारांनी त्यांच्या कर्जत जामखेड मतदारसंघात एमआयडीसी येण्यासाठी अनेक मार्गाने सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या एमआयडीसीच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तर खासदार सुजय विखे यांनी केलेल्या एमआयडीसीच्या मागणीला तत्वतः मंजुरी दिल्याची माहिती आहे. यावरून नगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे. यावर रोहित पवार काय उत्तर देणार याकडेही नगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (Latest Political News)

नगर शहरात असलेल्या एमआयडीसी जवळील वडगावगुप्ता येथे ६०० एकरावर फेज २ आणि शिर्डी येथे ५०० एकरावर दुसरी एमआयडीसी अशा दोन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी मिळावी आहे. याबाबत नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटलांनी (Sujay Vikhe Patil) माहिती दिली आहे. या एमआयडीसींमुळे जिल्ह्यातील १५ हजार तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचेही सुजय विखेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

Sujay Vikhe Patil, Rohit pawar
India Or Bharat : अबब! 'इंडिया'चा भारत करण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा आकडा पाहून डोळे होणार पांढरे

एकीकडे भाजपच्या विखेंच्या दोन एमआयडीली तत्वतः मान्यता मिळाली असली तरी दुसरीकडे कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कर्जत येथे एमआयडीसी होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मात्र या एमआयडीसीला मंजुरी देण्यासाठी महायुती सरकारने आडकाठी आणल्याचा आरोप करत पवारांनी थेट मंत्रालयाबाहेर उपोषण केले होते. (Maharashtra Political News)

Sujay Vikhe Patil, Rohit pawar
Eknath Shinde News : '' आठ महिने मुख्यमंत्री कार्यालयातला 'डमी ओसडी' कळत नसेल, तर..'' ; राष्ट्रवादीच्या नेत्याचा खोचक टोला

कर्जत, जामखेड तालुक्यातील नागरिकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको करून एमआयडीसी होण्यासाठी आंदोलनही केले होते. मात्र याबाबत सरकारने विचारही केला नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे पाटील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागणी केलेल्या अहमदनगर आणि शिर्डी येथील एमआयडीसीला तत्वतः मंजुरी दिली आहे. यामुळे रोहित पवार यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सरकारने केल्याची चर्चा नगरमध्ये आहे. सरकार एकाच मतदारसंघांमध्ये दुजाभाव करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com