Rohit Pawar News : जयंतराव शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच..; रोहित पवारांनी संजयकाकांना खडसावले ; म्हणाले, 'सांगलीच्या लोकल नेत्यांकडे लक्ष देऊ नका,'

Jayant Patil News : . पवारसाहेब दिल्ली समोर झुकणार नाहीत..
Jayant Patil News update
Jayant Patil News update Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे ठामपणे सांगणारे भाजपचे खासदार संजयकाका पाटलांना राष्ट्रवादीचे आमदार (शरद पवार गट) रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. "सांगलीच्या लोकल नेत्यांच्या विधानाकडे लक्ष देऊ नका, जयंतराव शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच राहतील," अशा शब्दात त्यांनी संजयकाकांना खडसावले.

"भाजपाच्या होकायंत्रांचा इशारा असून लवकरच जयंत पाटलांचा प्रवेश होईल," अशा शब्दात संजयकाकांनी जयंतरावांच्या भाजप प्रवेशाचे सुतोवाच केले आहे. त्यावर रोहित पवार कोल्हापुरात बोलत होते.

Jayant Patil News update
Sharad Pawar News : बाप हा बापचं असतो...: कोल्हापुरात बॅनरबाजी ; "योद्धा पुन्हा मैदानात.."

"भाजपची प्रवृत्ती आणि वृत्ती ही तोडाफोडीची आहे. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली पण त्यांना किती यश आले माहीत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो लावून अजित पवार गटाकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांची ती रणनीती असू शकते. लोकांचा प्रतिसाद काय आहे, हे महत्वाचे आहे," असे रोहित पवार म्हणाले.

Jayant Patil News update
Sanjaykaka Patil News : संजयकाकांची नवीन भविष्यवाणी ; म्हणाले, 'जयंत पाटील लवकरच भाजपप्रवेश करणार'

रोहित पवार म्हणाले, "जयंत पाटील भाजपमध्ये जाणार,या चर्चांकडे आपण दुर्लक्ष करायला हवे. त्यांनी शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. याचा अर्थ भाजपला स्वतःच्या कार्यकारणीवर विश्वास राहिलेला नाही. पवारसाहेब दिल्ली समोर झुकणार नाहीत,"

"पक्ष आणि कार्यकर्ते महत्वाचे आहेत. राष्ट्रवादी भक्कम करण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला हवे होते. पण काही नेत्यांनी पक्ष संपवण्याचा काम केले आहे," असा आरोप रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com