Rohit Pawar News: "भाजप आमचा मुख्य विरोधक; त्यांच्याशी युती अशक्य!"

Satara News: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष झाल्यानंतर आमदार रोहित पवार सातारा जिल्ह्यात आले होते.
MLA Rohit Pawar
MLA Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

सातारा : जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजप पीडीपीसोबत युती करत असेल, तर राजकारणात काहीही होऊ शकते. पण येथे भाजप हा आमचा मुख्य विरोधी पक्ष आहे, कारण तो संविधानाच्या विरोधात जात आहे. त्यामुळे आगामी काळात आम्ही (राष्ट्रवादी) त्यांच्यासोबत जाऊ असे मला वाटत नाही, असे स्पष्ट मत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर आमदार रोहित पवार आज सातारा जिल्ह्यात आले होते. आज त्यांनी नायगाव या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी भेट दिली. तेथील स्मारकाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सातारा क्लबला भेट दिल्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधला.

MLA Rohit Pawar
Maharashtra Politics : 'त्या' वक्तव्यावर जयंत पाटील यांचे घुमजाव

एका प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, "सातारा जिल्हा नियोजन समितीचा मोठ्याप्रमाणात निधी खर्च झालेला नाही. सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगावमध्ये विकास कामे करताना राजकारण आणण्याची गरज नाही. येथील विकास कामांचा साडेनऊ कोटी रुपयांचा निधी स्थगित केलेला आहे. एकीकडे सावित्रीबाई यांची जयंती मोठ्याप्रमाणात साजरी केली जात असताना, या ठिकाणच्या विकास कामात राजकारण आणण्याची गरज नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता रोहित पवार म्हणाले, "कोणीही येते आणि बोलून जाते त्यांना पवारच कळलेले नाहीत, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही," असे ते म्हणाले.

MLA Rohit Pawar
Chandrakant Patil : "एकत्र येणं आणि भ्रमनिरास होणं हा इतिहास" : पाटलांनी ठाकरे-आंबेडकरांना डिवचलं!

पार्थ पवार नाराज असून ते राष्ट्रवादी सोडणार असल्याचे ते सांगतात, या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, "पार्थ पवार हा माझा भाऊ आहे आणि आम्ही वेळोवेळी चर्चा करत असतो. जे कोण बोलत आहेत त्यांना अजून पवार कळालेले नाहीत. तसेच त्यांना त्यांचाच मतदारसंघ कळलेला नाही. त्यामुळे पवार ही त्यांच्यासाठी फार लांबची गोष्ट आहे. राहिला प्रश्न बारामतीचा त्यासाठी त्यांना बेस्ट ऑफ लक.. कारण लोक निर्णय घेतात, नेते निर्णय घेत नाहीत," असा सल्ला त्यांनी पडळकर यांना दिला.

MLA Rohit Pawar
Chandrakant Patil : कसबा-चिंचवड पोटनिवडणूक : चंद्रकांतदादा म्हणाले, "आमची यादी तयार.."

आगामी काळात अजित पवार हे भाजपसोबत युती करून मुख्यमंत्री होऊ शकतात का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, "राजकारणात कधी काही होईल हे सांगता येत नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजप जर पीडीपीसोबत जात असेल तर राजकारणात काहीही होऊ शकते. पण, येथे भाजप हा आमचा मुख्य विरोधी पक्ष आहे, कारण तो संविधानाच्या विरोधात जात आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ असे मला वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com