रोहित पवार म्हणाले, सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मोफत वकिली केली नाही...

ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांचे नातू आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्च न्यायालयाने काल ( गुरूवारी ) निकाल दिला. त्यानंतर मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन केले. या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पल व दगडफेक केली. या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांचे नातू आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी साम टिव्हीचे प्रतिनिधी सचिन आगरवाल यांच्याजवळ या आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ( Rohit Pawar said, Sadavarte did not advocate for ST employees for free ... )

आमदार रोहित पवार म्हणाले, ही गोष्ट निंदनिय आहे. काल (गुरुवारी) उच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालात सांगितले होते की, कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर सामान्य लोकांचा विचार करून कामाला रूजू व्हावं. त्यावेळी तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. अशा वेळी वकील सदावर्ते तेथे जातात भाषण देतात. भाषण ऐकले तर त्यात फक्त राजकारणच होतं. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचे हित नव्हते. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मोफत वकिली केली नाही. या वकिलीचे पैसेही त्यांनी घेतले, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, वकील सदावर्ते यांनी गरिब एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे कमवून व्यवहार केला. आणि तिथे जावून राजकीय भाषण करतात. भाजपच्या बाजूचे भाषण करतात. त्यांना काय भाजपची मक्तेदारी दिली होती. कर्मचाऱ्यांचे विषय मांडा, त्यांच्या बाजूने वक्तव्य करा, ते आपण मान्य करू. भाषणे करून लोकांना भडकवता. आज 200 लोक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरी जातात. त्यांच्या घरी त्यांची मुलगी, नातवंडे, कुटुंब आहे. नेत्यांची घरे सर्वांसाठी उघडे असतात मात्र ते आंदोलन करण्यासाठी नसतात. तिथे 200 लोक जातात दगडफेक, चप्पलफेक करतात. ही महाराष्ट्राला न शोभणारी गोष्ट आहे.

मला 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांना विनंती करायची आहे की, आपण जे आज पर्यंत सरकारला सहकार्य केले. काही गोष्टी मना सारख्या झाल्या नसतील मात्र संवाद आपण साधत होतो. एसटी कर्मचाऱ्यांना भाजपच्या काळात पाच वर्षांपूर्वी 450 रुपयांची वाढ मिळाली होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटले नाहीत. भाजपचे कोणीही भेटले नाही. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते हे एकटेच लढत होते. अशा वेळी हे लोक कुठे गेले होते, असा प्रश्नही रोहित पवारांना उपस्थित केला.

हे सरकार आपले सरकार आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे ऐकून घेतले. 41 टक्के पगारवाढ दिली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्यावर व कुटुंबावर राजकारण होत असेल तर ते कितपत योग्य आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक वर्षांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत मध्यस्थी केली होती. केवळ भाजपच्या काळात मध्यस्थी केली नव्हती. मनोहर जोशी मुख्यमंत्री असतानाही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात शरद पवार यांनी मध्यस्थी केली होती. यंदाही 41 टक्के पगारवाढ करण्यासाठी शरद पवार यांनी बैठक घेतली होती. भाजपच्या बाजूने काल वकील सदावर्ते यांचे वक्तव्य होते. आज आंदोलन झाल्यावर भाजपचे नेते राजकीय बोलत आहेत. त्यांना केवळ राजकारण दिसते, असा टोलाही त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com