कर्जतचं धुमशान : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रोहित पवारांना आर. आर. पाटलांची आठवण

Ram Shinde आणि Rohit Pawar यांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
Rohit Pawar-R.R.Patil 

Rohit Pawar-R.R.Patil 

Sarkarnama

Published on
Updated on

कर्जत : कर्जत नगरपंचायतची निवडणूक सुरू आहे. ही निवडणूक भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे (Ram Shinde) व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. दरम्यान आज या निवडणूकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज संध्याकाळनंतर प्रचाराचा धुरळा खाली बसणार आहे. पण याच प्रचाराच्या गडबडीत आज रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील (R. R. Patil) यांची आठवण झाली.

रोहित पवारांनी ट्विटरवरुन ही आठवण शेअर केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, कर्जत नगरपंचायतीचा घरोघरी प्रचार सुरु आहे. या दरम्यान प्रकर्षाने आठवण झाली ती महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आर. आर. आबा यांची आणि त्यांचा वारसा प्रामाणिकपणे चालवणारे माझे मित्र रोहित पाटील यांची. लोकांचा आणि युवांचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास आहे!

<div class="paragraphs"><p>Rohit Pawar-R.R.Patil&nbsp;</p></div>
भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने बाजारातच लसूण दिला पेटवून

दरम्यान आर.आर. पाटील आणि रोहित पाटील यांच्या बालेकिल्यातही सध्या निवडणूकीचे वारे वाहत आहेत. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणूकीच्या रिंगणात राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी रोहित पाटील (Rohit Patil) हे स्वतः उतरले आहेत. एवढेच नाही तर या निवडणूकीसाठी रोहित पाटील यांच्या विरोधात तेथील सर्वपक्ष एकत्र आले आहेत. यामुळे इथे रोहित पाटील विरुद्ध सर्वपक्ष अशी लढत होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Rohit Pawar-R.R.Patil&nbsp;</p></div>
सरकार कोणाचेही असो निधी आणण्याची ताकद माझ्या मनगटात

इकडे कर्जतमध्ये आज प्रचाराच्या सांगता सभेला ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांची सभा होणार आहे. तर राष्ट्रवादीकडून आज सर्व प्रभागांमध्ये फेरी काढून प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे भाजप व्यासपीठावर आणि राष्ट्रवादी मतदाराच्या दारावर अशी काहीशी कर्जतमधील परिस्थिती आहे. मंगळवारी ( ता. २१ ) नगरपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर १९ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com