
जामखेड : अहमदनगर जिल्ह्यात विविध निवडणुकांमुळे राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप, राजकीय सभा अशा कार्यक्रमांना वेग आला आहे. यातच जामखेड तालुक्यातील नान्नज येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांची सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपच्या चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांच्यावर टीका केली. Rupali Chakankar said, those whose husbands took bribes are asking us to give an account for two years...
या सभेत जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काका वाळुंजकर यांच्यासह समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी रुपाली चाकणकर, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विजयसिंह गोलेकर, कर्जतचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय वारे, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मधुकर राळेभात, सभापती सूर्यकांत मोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले उपस्थित होते.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, ज्यांच्या नवऱ्याने लाच खाल्ली व त्यांना पक्ष सोडावा लागला, ते आज आम्हाला दोन वर्षांचा हिशेब मागत आहेत. दोन वर्षांचा हिशेब काय मागता? सत्तर वर्षांचा हिशोब देऊ; मात्र आम्हाला भ्रष्टाचाऱ्यायांनी हिशेब मागू नये, असा टोला चित्रा वाघ यांना रूपाली चाकणकर यांनी लगावला.
चाकणकर पुढे म्हणाल्या, की आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडचा विकास साधला, तसेच जनतेचा विश्वास संपादन केला. दोन वर्षांत मोठी कामे केली. मतदारसंघाच्या विकासाबरोबर गुंडांनादेखील लगाम लावला. विरोधक जातीपातीचे राजकारण करून समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल, अशी स्वप्ने विरोधकांना रोजच पडत आहेत. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले हे ज्यांना माहीतच नाही, त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. जो जास्त खोटे बोलेल, त्यालादेखील पद्मश्री पुरस्कार दिला जाईल, अशा शब्दांत चाकणकरांनी विरोधकांवर टीका केली.
आमदार रोहित पवार म्हणाले, की गेल्या पाच वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती मी अवघ्या दोन वर्षांत पूर्ण केली आहेत. गुरेवाडी रस्त्यावरील पूल, तसेच बोरले ते जवळा रस्ता आदींची कामे मंजूर झालेली आहेत. ती देखील लवकरच पूर्ण होतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.