Karad News : प्रस्थापित मराठे ७० वर्षे सत्तेवर होते, ते काय गांजा ओढत होते का? की गोट्या खेळत होते? त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिले नाही? देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी आरक्षणाचे हत्यार वापरले जात असून, त्यासाठीच मराठ्यांसह अनेक समाजाची आंदोलने सुरू झाली आहेत, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. (Sadabhau Khot strongly criticized Maratha leaders on issue of reservation)
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे कराड (जि. सातारा) दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. मात्र, दुर्देवाने कोणीही मुळाशी जात नाही. फडणवीसांनी मराठा समाजासाठी दिलेले आरक्षण टिकले होते. आघाडी सरकारने योग्य भूमिका न घेतल्याने आरक्षण टिकले नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्वांना समान न्याय देणे गरजेचे असून, संपूर्ण आरक्षणाची फेरमांडणी करावी लागेल.
मराठ्याच्या पोरांनी शेती केली तरी माती अन् शाळा शिकली तरी माती होत आहे. मराठा समाज खेड्यापाड्यामध्ये राहणारा, शेती करणारा समाज आहे. कालांतराने शेतीचे तुकडे झाले आणि शेतावर पोट भागत नसल्याने शिकलेल्या मराठा समाजाचं पोरं नोकरीसाठी बाहेर पडली. तेव्हा मराठा समाजाच्या पोरांच्या लक्षात आलं की १०० मार्क मिळवूनही ५० मार्काचा पोरंगा पुढं जातो, अन् आपण मागं राहतो, असेही खोत यांनी नमूद केले.
मराठा शेतकऱ्यांच्या पोरांनी शेती केली तरी माती होते अन् शाळा शिकलो तरी माती होते, त्यामुळे आता मराठा समाजाचा, शेतकऱ्याचा पोरगा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मात्र, प्रस्थापित मराठे ७० वर्षे सत्तेवर होते, ते काय गांजा ओढत होते का, की गोट्या खेळत होते? त्यांनी का मराठ्यांना आरक्षण दिले नाही. सध्या फक्त देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी आरक्षणाचे हत्यार वापरले जात आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.