Mangalwedha Maratha Protest
Mangalwedha Maratha ProtestSarkarnama

Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात तरुणांचे मुंडन आंदोलन

Mangalwedha Agitation : सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलनाचा चौथा दिवस
Published on

Solapur Political News : जालन्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढ्यात समाजातील लोकांनी विविध आंदोलन करत आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने पाच दिवसांच्या या आंदोलनात तालुक्यातील मोठ्या प्रमाणात समाजाबांधव सहभागी होऊन आरक्षणाची ज्योत तेवत ठेवताना दिसत आहे. येथील दामाजी चौकात आंदोलन सुरू असून शुक्रवारी चौथ्या दिवशी २० तरुणांनी मुंडन करून आरक्षण लांबणीवर टाकणाऱ्या सरकारचा निषेध केला. (Latest Political News)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) होत असलेल्या चालढकलीच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने १२ ते १७ सप्टेंबर या दिवसांत आंदोलन करण्यात येत आहे. यात १२ सप्टेंबरला रास्ता रोको आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालय, बँका, पतसंस्था, एसटी बसस्थानक 13 सप्टेंबरला बंद ठेवण्यात आले. शहरातून आक्रोश मोर्चा काढून सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर १४ सप्टेंबरला अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर शुक्रवारी २० तरुणांनी एकत्रित मुंडन करून सरकारचा निषेध व्यक्त केला.

Mangalwedha Maratha Protest
Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी चौंडीत दहा दिवसांपासून उपोषण; सरकारचे दुर्लक्ष ? राम शिंदे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

या आंदोलनाला आमदार समाधान आवताडे यांनी गुरुवारी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेत आहे. न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आंदोलन थांबवावे, अशी आवाहन आवताडेंनी केले. यानंतरही मंगळवेढ्यात आंदोलन सुरूच आहे. (Maharashtra Political News)

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संभाजी घुले, शिवाजी वाकडे, दत्तात्रय भोसले, मारुती वाकडे, सुखदेव डोरले, ज्ञानेश्वर कोंडूभैरी राहुल सावजी, संभाजी घुले, अनिल मुद्गुल, सतीश दत्तूभाऊ साळुंखे, संग्राम सावंजी, नंदू जाधव, अजित नागणे, पिंटू सावंजी, विजय हजारे, नारायण गोवे, नाना भगरे, रामा जाधव, नाना हेंबाडे, रामभाऊ दत्तू, रामा जाधव, गणेश सावजी, नितीन इंगळे, प्रकाश मुळीक, नागेश भगरे, दिलीप जाधव, विक्रम भगरे, आतिश लांडे, महादेव मुढे, दत्तात्रय खडतरे, आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Mangalwedha Maratha Protest
Jitendra Awhad News : 'जितेंद्र आव्हाडांचे मराठा आंदोलनात दंगे पेटवण्याचे...'; शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com