Sambhajiraje On Vishalgad : विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा चिघळणार; संभाजीराजेंनी थेट अतिरेकी यासिन भटकळचंच नाव घेतलं

Vishalgad illegal Construction : अतिरिक्यांचे वास्तव्य असलेल्या या किल्ले विशाळगडावर सरकारला अतिक्रमण चालतच कसे?
Sambhajiraje
SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Political News : कोल्हापूरमधील शाहुवाडी तालुक्यातील किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमाणावरून मुद्दा तापला आहे. त्यातच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नव्या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे विशाळगडावरील अतिक्रमण पुन्हा एकदा वाद्याच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांनी अतिरिक्यांचे वास्तव्य असलेल्या या किल्ले विशाळगडावर सरकारला अतिक्रमण चालतच कसे? असा सवाल करत पालकमंत्री हसन मुश्रीफ Hasan Mushrif आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमणावरून संभाजीराजे छत्रपती Sambhajiraje यांनी सरकारवर जोरदार टीका केली. पुणे बॉम्बस्फोटमधील आरोपी यासीन भटकळ हा किल्ले विशाळगडावर सहा दिवस राहून गेला आहे, असा दावाच त्यांनी केला आहे. याबाबतची नोंदही आपल्याकडे असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. संभाजीराजे यांच्या या आरोपानंतर किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण चर्चेत आले असून हिंदुत्वाची संघटना पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यत आहेत.

Sambhajiraje
Maharashtra Politics : MVA त मोठं राजकीय नाट्य! ठाकरेंची आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी, MLC निवडणुकीपूर्वी नेमकं काय घडलं?

कोण आहे यासीन भटकळ?

यासीन भटकळ याला अहमद सिद्दीबाप्पा जरार म्हणूनही ओळखले जाते. हा मूळचा कर्नाटकातील भटकळ जिल्ह्यातील आहे. देशातील अनेक दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनचा तो मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जाते.

यासीन भटकळ वर हैदराबाद, पुणे आणि सुरत येथील बॉम्बस्फोटाचे आरोप आहेत. पुण्यातील जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात चा मुख्य सूत्रधार म्हणून यासीन भटकळवर आरोप आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com