Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता असणारा आणि सांस्कृतिक आणि क्रीडा नगरीचा सांस्कृतिक ठेवा असणारा ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले आणि खासबाग मैदान आगीत जळून खाक झाले. हा कोल्हापूरकरांचा काळा दिवस आहे. अशा गोष्टी कोल्हापुरात वारंवार घडणं हे दुर्दैवी आहे. हे आताच का घडलं? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) छत्रपती यांनी केली आहे. आज सकाळी दहा वाजता त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती यांनी केशवराव भोसले नाट्यगृह (Keshavrao Bhosale Natyagruh) येथे भेट घेऊन अग्निशामन दलाच्या जवानांकडून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ही वास्तू पुन्हा नव्याने उभा करण्याची जबाबदारी घेऊ शकतो. राजकारण न आणता प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पाडू शकतो.
ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण आपण करू शकत नाही. जे प्रोटोकॉल लावायला पाहिजे होते ते लावले असते तर हे घडलं नसतं. जुन्या वास्तूंचे संरक्षण करणे प्रशासनाची आणि सर्वांची जबाबदारी आहे. राज्य सरकारने (Government) या सर्व घटनेबाबत समिती नेमावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.
या वास्तूशी आपल्या सगळ्यांच्या भावना जोडलेल्या आहेत. राजकारण बाजूला ठेवून ही वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी एकत्र येणं गरजेचं. आपल्या सर्वांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. हे सगळं शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या नगरीत घडतंय हे दुर्दैवी आहे. कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्यासाठी सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलं पाहिजे. या वास्तूचा अभ्यास केला पाहिजे. इतके वर्षे असं काही घडलं नाही, आताच का घडलं याची चौकशी व्हायला पाहिजे. सरकारने एक समिती नेमून या वास्तूच्या पुनर्बांधणीबाबत निर्णय घ्यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.