Samruddhi Highway News : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे (Samruddhi Mahamarg Mumbai Nagpur Expressway) आज (२६ मे) लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत आयोजित सोहळ्यात या महामार्गाचे लोकार्पण केलं. शिर्डी ते भरवीर पर्यंतचे 80 किमी लांबीचा महामार्ग आहे. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरही टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "समृ्द्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू करतो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होते. अनेकांनी या प्रकल्पाला विरोध केला, हा मार्ग होऊ शकत नाही. अनेकांना समृद्धी एक स्वप्न वाटायाचं, काहींना वाटायचं हा प्रकल्प सुरू होईल, पूर्ण करता येणार नाही. मला विश्वास होता की, आम्ही हा प्रकल्प रेकॉर्ड वेळेत पूर्ण केला, येत्या ६ ते ८ महिन्यात समृद्धी महामार्ग पूर्म संपूर्ण केला जाईल."
"मला आठवतं आमदारांची बैठक घेऊन, मी समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाचं एक सेशन मी घेतलं होतं. सर्व आमदारांची समजूत घातली. आम्ही यानतंर राज्यातील संपादकांची एक बैठक घेतली. या प्रकल्पाला तुम्ही पाठिंबा दिला. त्या बाजूने उभे राहिलात तर तो वेळेत पूर्ण होऊ शकतो. यानंतर आपण भूसंपादनाचा नवा कायदा आणला. अनेकांनी याला विरोध केला. तेव्हा आमच्या सोबत असलेले उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये सभा घेऊन, या प्रकल्पाला विरोध केला. शरद पवारांनी हा प्रकल्प होऊ शकत नाही, असं म्हंटलं. पण तो आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही ते पूर्ण केलं," असे ही फडणवीस मिळवले.
"हा केवळ समृद्धी महामार्ग नाही. हा एक इकोनॉमिक काॉरिडॉर आहे . या प्रकल्पामुळे राज्याच्या १५ जिल्ह्याचं भाग्य बदलणार आहे. मोठ्या प्रमाणावर उद्योग, कृषी विकास आपण करू शकणार आहोत. या महामार्गावर १२० ची स्पीड पर्यंतच्या गतीला परवानगी आहे. मात्र महामार्गावर बहुतांशी जुन्या गाड्या येतात. माझी त्यांना विनंती आहे की, जुन्या गाड्या घेऊन जास्त स्पीडने जाऊ नका. महामार्ग बहुतांली अंतर सरळ आहे. यामुळे त्यामुळे डुलकी येऊ शकते, अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी," असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.