रोहित पाटलांपुढे भाजप फेल; संजयकाकांच्या पॅनेलमधील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

Rohit Patil | Sanjay Patil : रोहित पाटीलची राजकारणातील यशस्वी घौडदौड कायम...
R.R. Patil Rohit Patil
R.R. Patil Rohit Patil Sarkarnama

तासगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दिवंगत नेते आर. आर. पाटील (R.R.Patil) यांचा मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) याने राजकारणातील यशस्वी घौडदौड कायम ठेवली आहे. कवठेमहांकाळ नगरपरिषद निवडणुकीनंतर रोहित पाटील याच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने आता तासगांव तालुक्यातील किदरवाडी ग्रामपंचायतीचे मैदान मारले आहे. ग्रामपंचायतीमधील सर्व ७ जागा जिंकत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता खेचून आणली आहे.

इतकंच नाही तर भाजपचे खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांच्या पॅनेलमधील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या विजयानंतर रोहित पाटील यांचे राजकारणातील चालींपुढे भाजपचे दिग्गजही फेल असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आर. आर. पाटील यांच्या जाण्याने तासगांवच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी रोहित पाटील यांच्या रुपाने भरुन काढण्यास राष्ट्रवादी काँग्रेस मदत होत आहे.

सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी या ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीची घोषणा झाली होती. आज या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. आज सकाळी तासगाव तहसिलदार कार्यालयावर ही मतमोजणी पार पडली. निवडणुकीत ६७७ मतदारांपैकी ३७८ जणांनी मतदान केले होते. ३ प्रभागांमध्ये ७ जागांसाठी १४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. मात्र रोहित पाटील यांनी गावकऱ्यांच्या मनाला हात घालून सर्व जागांवर एकहाती विजय मिळवत ग्रामपंचायत खिशात घातली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com