भाजपचे राजकारण घाणेरडं असल्याची टीका सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. लोकसभेत मुद्दाच मांडला जाऊ देत नाही, असा आरोप विशाल पाटलांनी केला आहे. दोन तृतीयांश विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या लोकांच्या राजकारण खूप घाणेरडं असते. लोकसभेत मुद्दे मांडत असताना तिथे ओरडावं लागते. ओरडल्याशिवाय मुद्दा मांडू देत नाहीत.पण तुमचा मुद्दा मांडण्यासाठी, तुमचे कामे करण्यासाठी रोज मिठाच्या गुळण्या कराव्या लागल्या तरी चालेल. पण तुमचा मुद्दा, तुमचा आवाज दिल्लीत लोकसभेत मांडणारच. सत्ताधारी भाजप काँग्रेसचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.
लोकसभेची आकडेवारी जर पाहिली आगामी विधानसभेत काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रात येईल, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला. त्यासाठी माझे हात बळकत केले पाहिजे, विश्वजीत कदम यांचे हात बळकत केले पाहिजे. त्यासाठी या जत विधानमतदारसंघात पुन्हा एकदा कर्तुत्ववान विक्रमसिंह सावंत यांना निवडून दिले पाहिजे, असे आवाहन विशाल पाटलांनी केले. ते जत येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
काही दिवसापूवी सांगलीत मुसळधार पाऊस कोसळत असताना जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील लोकसभेत सत्ताधाऱ्यांवर बरसले. सांगलीसह कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पूरस्थितीवर बोलताना विशाल पाटील यांनी कोयना तसेच अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीवरही नाराजी व्यक्त केली. या धरणांसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने केंद्रीय जल आयोगाच्या निकषांचे उल्लंघन केल्याचा दावा पाटील यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.