साधूंना मारहाण करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते ; काँग्रेस साधू-संतांची माफी मागणार का ? भाजपचा सवाल

Sangli Sadhu Beaten Case : . "काल टाहो फोडणाऱ्या काँग्रेस पक्षाला आज आमच्या साधू संतांची माफी मागावीच लागेल,"असे राम कदम म्हणाले.
Sangli Sadhu Beaten Case
Sangli Sadhu Beaten Case sarkarnama

सांगली : पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या चार साधूंना सांगली (sangli) जिल्ह्यातील लवंगा येथे ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. मुल चोरणारी टोळी असल्याची संशयावरून ही मारहाण करण्यात आली होती. (Sangli Sadhu Beaten Case)

कारमधून ओढून रस्त्यावर लाथाबुक्याने चामडी पट्ट्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेची दखल पोलीसांनी घेतली असून याप्रकरणी 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता पर्यंत 8 जणांना ताब्यात घेऊन 7 लोकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कॉंग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे.

यावरुन भाजपचे नेते राम कदम (Ram Kadam) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. राम कदम म्हणाले, "सांगली येथे साधूंना मारहाण करण्यात आली. हा अपमानास्पद प्रकार घडला आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. मग आता काँग्रेसपक्ष देशासमोर सर्व साधू संतांची माफी मागणार का ? असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. "काल टाहो फोडणाऱ्या काँग्रेस पक्षाला आज आमच्या साधू संतांची माफी मागावीच लागेल,"असे राम कदम म्हणाले.

मारहाण झालेले चार ही साधू उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मथुरा पंचदर्शन जुना आखाड्यातील आहेत. ते कायम विविध धार्मिक स्थळी भेट देतात. नेहमीप्रमाणे त्यांनी कर्नाटकातील काही धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर मंगळवारी वारकरी संप्रदायातील मुख्य ठिकाण पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात होते.

Sangli Sadhu Beaten Case
Refinery Project : 'वेदांता' नंतर 'हा' प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार ? ; कंपनीकडून अल्टिमेंटम ?

दरम्यान ते लवंगा (ता.जत) येथे चार चाकी गाडीतून आले यावेळी पंढरपूरकडे जाण्याचा रस्ता एका विद्यार्थ्याला विचारला यातून गावात पोरे चोरणारी टोळी आल्याची अफवा पसरली. आणि त्यात चारही साधूना जमावाच्या रोषास सामोरे जावे लागले. सुरुवातीस शिव्याची लखोली वाहली.

यावेळी साधूंनी आम्ही वारकरी संप्रदायातील आहोत. आम्हाला पंढरपूरला जाऊ द्या अशी विनवणी केली. परंतु जमावाला दया आली नाही उलट गाडीतून साधूंना रस्त्यावर ओढले, मारहाण केली याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com