Sangli Lok Sabha Constituency : जागावाटपाचा तेढ वाढला; महाआघाडीला कुणाची 'नौटंकी' पडणार भारी?

Sanjay Raut VS Nana Patole : महाविकास आघातीत सांगलीवरून सुरू झालेला काँग्रेस - ठाकरे गटातील वाद तुटेपर्यंत ताणला जाण्याची शक्यता आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कलगीतुरा रंगला.
Nana Patole, Sanjay Raut
Nana Patole, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन तीन आठवडे उलटले तरी महायुती आणि महाविकास आघडीतील काही जागांवरील घोळ मिटण्याचे नाव घेताना दिसत नाही. महाविकास आघातीत सांगलीवरून Sangli सुरू झालेला काँग्रेस - ठाकरे गटातील वाद तुटेपर्यंत ताणला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांच्या कलगीतुरा रंगला. परिणामी सांगलीवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. Nana Patole Reply Ranjay Raut over Sangli.

सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील Chandrahar Patil यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राऊत सांगलीत तळ ठोकून होते. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी प्रामुख्याने काँग्रेसला विश्वासात न घेता ठाकरेंनी उमेदवार दिली आहे. ही जागा काँग्रेसची असून तेथून आमचाच उमेदवारी लढणार, अशी भूमिका काँग्रेसच्या सांगलीसह राज्यातील नेत्यांनी घेतली आहे. यावर आघाडीतील पक्ष पवार गट आणि काँग्रेसने नौटंकी बंद करावी, असे राऊतांनी सुनावले.

सांगलीतून आमचाच, उमेदवार चंद्रहार पाटील लढणार असून त्याबाबत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा झाली आहे. पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray जाहीर केली असून ती काळ्या दगडावरची रेष आहे. सांगलीत आमची कोंडी कराल तर राज्यभर तुमची कोंडी करू. त्यामुळे काँग्रेस आणि शरद पवार गटाने नौटंकी बंद करावी, अशा शब्दात राऊतांनी ठासून सांगत उमेदवार मागे घेण्यात येणार नाही, असेच सूचित केले आहे. राऊतांची भाषा काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. त्यावरून पटोलेंनीही राऊतांना त्यांच्याच भाषेत सडेतोड प्रत्युत्तर दिले.

Nana Patole, Sanjay Raut
Lok Sabha Election: तहात मिळत असेल तर युद्धाची...; शिवतारेंनी माघार घेण्याचं सांगितलं कारण

राऊत हे ठाकरे गटाचे मोठे नेते आहेत. त्यांनी असे लहान कार्यकर्त्यांसारखी वक्तव्ये करू नयेत. आपल्या भाषेवर, शब्दांवर मर्यादा घालाव्यात. सांगलीचा तिढा सामोपचाराने सोडवण्यावर आमचा भर आहे. त्यामुळे राऊतांनी छोट्या कार्यकर्त्यांसारखी विधाने करून आघाडीत तेढ निर्माण होईल, अशी विधाने टाळावीत, असा सल्लाच पटोलेंनी राऊतांना दिला आहे. यावर मी जबाबदारीने बोलणारा माणूस असल्याचे राऊत म्हणाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, सांगलीवरून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद टिपेला पोहोचण्याची शक्यता आहे. सांगली राखण्यासाठी काँग्रेसचे नेते विश्वजीत कदमांनी दिल्लीत हायकमांड यांना गळ घातलेली आहे. त्यातच सांगलीत प्रचारासाठी आलेल्या राऊतांच्या आक्रमक विधानांनी काँग्रेसचे नेते बिथरल्याचे दिसते. त्यामुळे महाआघाडीत सांगलीवरून सुरू झालेली नौटंकी कुणाला भारी पडणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Nana Patole, Sanjay Raut
Pune BJP : भाजपला धक्का! अतुल देशमुखांचा राजीनामा; शिरुरमधील महायुतीचं गणित बिघडणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com