Lok Sabha Election: तहात मिळत असेल तर युद्धाची...; शिवतारेंनी माघार घेण्याचं सांगितलं कारण

Baramati Lok Sabha Election 2024: विजय शिवतारे हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. सासवडला येत्या 11 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे.
Vijay Shivtare
Vijay ShivtareSarkarnama
Published on
Updated on

Baramati Lok Sabha Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बारामती लोकसभेसाठी (Baramati Lok Sabha) अजित पवारांना जोरदार विरोध केला होता. शिवाय त्यांनी बारामती लोकसभा लढवण्याची तयारीही केली होती. मात्र, महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर शिवतारे यांनी माघार घेतली होती.

विजय शिवतारेंनी माघार घेतली परंतु त्यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) अनेक आरोप केल्यामुळे त्यांच्यावर टीकाही होऊ लागली. अशातच आता विजय शिवतारे हे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. सासवडला येत्या 11 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे.

या सभेसंदर्भात प्रश्न विचारला असता शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले, ही सभा नाही तर जनसंवाद, शेतकऱ्यांशी संवाद असणार आहे. एखादी गोष्ट युद्ध करून जिंकून मिळवता येते, परंतु तहात मिळत असेल तर युद्ध करण्याचं कारण नाही. पुरंदरच्या (Purandar) जनतेच्या हितासाठी मी लढतोय. शिवाय येत्या 11 तारखेला होणाऱ्या सभेला 50 हजार लोक जमतील. या आधीही सासवडला ज्या मोठ्या सभा झाल्या आहेत. त्या शिवसेनेच्या (Shivsena) आणि माझ्याच झाल्या असल्याचं शिवतारेंनी सांगितलं.

Vijay Shivtare
Baramati Lok Sabha News: सुळेंचे प्रचारप्रमुख अजितदादांच्या गटात, सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला केली सुरुवात

दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Lok Sabha Constituency) त्यांनी माघार का घेतली? याबाबत प्रश्न विचारला असता शिवतारे म्हणाले, मी माघार घेतली कारण हे महायुतीचा विजय झाला पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सगळं ऐकून घेऊन त्यातून मार्ग काढल्यामुळे मी माघार घेतली. शिवाय जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत.

पुरंदरचं एअरपोर्ट, गुंजवणीचं पाणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या. माघार घेताना काय ठरलं हे स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जनतेला सांगतील. तसेच लोकांच्या हिताचे प्रश्न आहेत. माझे वैयक्तिक कुठलेही प्रश्न नाहीत. विधानसभा अजून लांब आहेत. विधानसभे संदर्भात नेत्यांना काय बोलायचं असतील तर ते बोलतील, असंही शिवतारे यावेळी म्हणाले.

Vijay Shivtare
Lok Sabha Election 2024 : माढ्यात राजकीय हालचालींना वेग; शहाजीबापूंना घाम फोडणाऱ्या डॉ. अनिकेत देशमुखांनी घेतली पवारांची भेट

कार्यकर्त्यांने विचारला होता प्रश्न

विजय शिवतारेंनी माघार घेतल्यानंतर त्यांना एका कार्यकर्त्यांनी खरमरीत पत्र लिहिलं होतं. हे पत्र चांगलंच व्हायरल झालं. विजय शिवतारेंनी अजित पवारांना माझा आवाका कळेल का? अशा गर्जना केल्या होत्या. मात्र नंतर त्यांनी आपलं बंड मागे घेतलं. याच पार्श्वभूमीवर, 'माझा नेता पलटूराम निघाला, आता 5 लाख पवार विरोधी मतांनी काय करायचं?' असा प्रश्न कार्यकर्त्यांने पत्रात उपस्थित केला होता.

(Edited By Jagdish Patil)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com