Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama

Satara Politics : उदयनराजे अमित शहांच्या पुढे झुकले; साताऱ्यातूनच आपच्या संजय सिंहांचा घणाघात

Satara Lok Sabha Constituency : एकीकडे शशिकांत शिंदे आहेत जे तुम्हाला मचांवरून नमन करतात आणी दुसरीकडे उदयनराजे आहेत, जे सांगतात मला नमस्कार करा.

Satara NCP News : आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. छत्रपती शिवाजी महाराज आदिल शहाच्या समोर कधीही झुकले नाहीत. परंतु, उदयनराजे अमित शहाच्या पुढे झुकले. तिकीटासाठी पाच दिवस त्यांना भेटू शकले नाहीत. छत्रपतींचा एक संदेश आहे, गद्दारांना माफी नाही. त्यामुळे छत्रपतींच्या भूमितून सांगतो बाळासाहेब ठाकरे व शरद पवारांचा पक्ष चोरणाऱ्यांना हरवायचे काम करा, असे आवाहन आपचे खासदार संजय सिंह यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांच्या प्रचारार्थ साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित सांगता सभेत खासदार संजय सिंह बोलत होते. यावेळी खासदार शरद पवार, आमदार शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजय सिंह म्हणाले, सभेतील एवढी संख्या पाहून नरेंद्र मोदींनाही कळाले आहे की शशिकांत शिंदे जिंकून येत आहेत. एकीकडे शशिकांत शिंदे आहेत जे तुम्हाला मचांवरून नमन करतात आणी दुसरीकडे उदयनराजे Udayanraje आहेत, जे सांगतात मला नमस्कार करा. कोणाला साथ देणार याचा निर्णय घ्या.

शरद पवार Sharad Pawar 84 वर्षांचे आहेत, परंतु, परिश्रम, मेहनतीने ते मोदीच्या हुकुमशाहीच्या विरोधात लढत आहेत. त्यांना प्रधानमंत्री भटकती आत्मा म्हणतायत. त्यांच्या मरणाचा इच्छा ठेवतात. महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्या नेत्याच्या अपमानाचे उत्तर द्यायचे आहे. साताऱ्यातील संख्या बघून सांगतो, शरद पवार आपल्या साथीने नरेंद्र मोदीची राजानीती गाडून टाकण्याचे काम करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा लढण्यात विश्वास ठेवतो, झुकण्यात नाही. गद्दारी करणाऱ्याला क्षमा करत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या, देशाच्या स्वभिमानासाठी 84 वर्षांच्या योद्धा लढतोय, कामगारांचा नेता आपल्यासाठी मैदानात उभा आहे. त्यांना मोठ्या मताधिक्यांने विजयी करा. गद्दारांना धडा शिकवा, असे आवाहनही संजय सिंह यांनी केले.

(Edited by Sunil Dhumal)

Udayanraje Bhosale
Raj Thackeray Konkan : उद्धव ठाकरे अन् नारायण राणे यांच्यात 'असा' फरक; राज ठाकरे नेमके काय म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com