Mohan Bhagwat : प्रत्येकातील ’स्व’ जागृत करण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले - सरसंघचालक भागवत

Sarsangchalak News : ''आपली प्रत्येक कृती देशहिताचीच राहिल, या दृष्टीकोनातून वाटचाल करणे ही आपली जबादारी'' असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
Mohan Bhagwat
Mohan Bhagwat Sarkarnama
Published on
Updated on

Sangali News : ''सनातन धर्माची जगाला आवश्यकता आहे. या धर्माची तहान सर्वांना लागली असून सर्वजण भारतावर नजर ठेवून आहेत. त्यामुळे आपला ‘स्व’ स्पष्ट झाला पाहिजे. वाटेल ती किंमत मोजून देशाचे आणि देशबांधवांचे हित साधेल तो धर्म आम्ही उभा करु. देश मोठा झाला तर जगावर अधिपत्य गाजवणारा आणि सर्वांना बरोबर घेवून जाणारा भारत विश्वगुरु ठरेल.'', असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगलीत व्यक्त केला.

सांगली येथील चिंतामणराव पटवर्धन व्यापार महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर लोकमान्य टिळक स्मारक मंदिरच्या शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये डॉ. भागवत बोलत होते. व्यासपीठावर स्वागताध्यक्ष आ. सुधीर गाडगीळ, संस्थेच्या अध्यक्षा मनिषा काळे, माधव बापट, प्रकाश बिरजे, माणिक जाधव, अमृता गोरे, विनायक काळे आदी. उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mohan Bhagwat
Dr.Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांनी सांगितलं, देशहितासाठी...

सरसंघचालक मोहन भागवत(Mohan Bhagwat) म्हणाले, ''समाजाला दिशा देण्याची नेहमीच आवश्यकता असते. सभोवतालची परिस्थिती बदलली तरी आपल्या ध्येयाची दिशा कायम राहिली पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी सशस्त्र क्रांतीचा प्रवाह समाजमनात होता. परंतु स्वातंत्र्यानंतर समाज सुधारणेकरिता आंदोलने सुरु झाली. आपण ज्यावेळी स्वराज्य हा शब्द उच्चारतो त्यामध्ये असणारा ’स्व’ हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कित्येकांना ’स्व’ ची ओळख नसते. प्रत्येकातील ’स्व’ जागृत करण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केले. '

तसेच, ''स्वातंत्र्याची उर्मी ही स्वाभाविक गोष्ट आहे. कोणत्याही समाजाला गुलामीत राहणे आवडत नाही. हा ’स्व’ चा परिणाम आहे. त्याची जोपासना करण्यासाठी टिळकांनी हरप्रकारे प्रयत्न केले. ’स्व’ जागृत झाला की अनेक समस्या सुटण्यास सहाय्य होते. कित्येकजण म्हणतात की, भगवतगीता आयुष्याच्या उत्तरार्धात वाचावी. परंतु जीवनाला दिशा देण्याचे कार्य गीता करते. सर्व उपनिषदांच्या चिंतनाचा परिपाक म्हणजे गीता आहे. त्यामुळे गीता युवापिढींनी वाचली पाहिजे.'' असेही भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat
Maratha Reservation : ''आज्याच्या, बापाच्या जात प्रमाणपत्रावर मराठा असताना...'' ; नाना पटोलेंचा जरांगेंना सवाल!

याशिवाय ''आज जगाची नजर भारताकडे आहे. भविष्यात भारत विश्वगुरु बनलेला आपल्याला पहावयास मिळेल. देश परमवैभवाला नेण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न केले पाहिजेत. निरामय विश्व निर्माण करण्याची जबाबदारी नियतीने भारतावर सोपविलेली आहे. त्याकरिता प्रयत्नशील राहणे म्हणजेच आपली प्रत्येक कृती देशहिताचीच राहिल या दृष्टीकोनातून वाटचाल करणे ही आपली जबादारी आहे.'' असे सरसंघचालक डॉ. भागवत यांनी सांगितले.

याचबरोबर ''आपला देश आता जगात उपेक्षित राहिलेला नाही. जगाचे डोळे आपल्यावर आहेत. अनेक विविध प्रकारे प्रयोग केले. विज्ञानाची प्रगती झाली. खूप सुख-सोयी झाल्या त्याच्यामुळे जीवन सोपे झाले. हाताच्या बोटावर सगळं जग आले. एका क्षणात दुसरीकडे संदेश पाठवू शकतो. इतकी प्रगती झाली पण हिंसा थांबली नसल्याबद्दलही डॉ. भागवत यांनी खंत व्यक्त केली.

प्रारंभी संस्थेचे विश्वस्त प्रकाश बिरजे यांनी सरसंघचालक डॉ. भागवत यांचा परिचय करुन दिला. स्वागताध्यक्ष आ. सुधीर गाडगीळ यांनी शताब्दी वर्षानिमित्त अनेक संकल्प करण्यात येत असल्याचे सांगितले. संस्थेच्या अध्यक्षा मनिषा काळे यांनी टिळक स्मारक मंदिरची माहिती दिली. या कार्यक्रमास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, दिनकर पाटील, मकरंद देशपांडे, प्रभाकर पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com