Satara News : अमित ठाकरेंना 'हा' परफ्यूम भेट देत उदयनराजे म्हणाले, "आता मोठ्या माणसासारखे.."

Amit Thackeray News : परफ्यूम भेट देण्यामागील कारणही उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.
Amit Thackeray, Udayanraje Bhosale
Amit Thackeray, Udayanraje Bhosalesarkarnama

Amit Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray)हे सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

त्यांनी आज (रविवारी) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना बलगारी मॅन (Bvlgari Man) हा परफ्यूम भेट दिला. हा परफ्यूम भेट देण्यामागील कारणही उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.

फटाक्यांची आतषबाजी..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचे काल (शनिवारी) रात्री उशिरा साताऱ्यात आगमन झाले. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांचे मनसेचे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार यांनी स्वागत केले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी व फटाक्याची आतषबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

Amit Thackeray, Udayanraje Bhosale
Mumbai News : 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' कडे ठाकरे गट, मनसेनं फिरवली पाठ...

सातारी कंदी पेढे देऊन स्वागत

आज (रविवार) सकाळी अमित ठाकरे यांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व सातारी कंदी पेढे देऊन स्वागत केले. अमित ठाकरे यांनीही उदयनराजे यांचा सत्कार केला.

Amit Thackeray, Udayanraje Bhosale
Sanjay Raut : काश्मीरमधून 370 कलम हटवल्यावर काय बदलले ? ; राऊतांचा मोदी सरकारला सवाल

आमचे त्यांच्याशी जुनं नातं

यावेळी अमित ठाकरे म्हणाले, "साताऱ्याला आलो आणि राजेंना भेटलो नाही असे होणार नाही, आमचे त्यांच्याशी जुनं नातं आहे. ही राजकीय भेट नाही. ते म्हणाले की मुलगा आल्यासारखे वाटले त्यामुळे खूप बरे वाटले,"

Amit Thackeray, Udayanraje Bhosale
Santosh Bangar News : व्हिडिओ व्हायरल झालेल्या 'त्या' प्राचार्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

ते आता लहान मुलगा राहिले नाहीत..

"मी अमित ठाकरे यांना बलगारी मॅन हा परफ्यूम भेट दिला आहे. कारण ते आता लहान मुलगा राहिले नाहीत, ते आता मोठ्या माणसासारखे वागणार असून आपल्या सगळ्याची काळजी घेणार आहेत, असे उदयनराजे भोसले म्हणताच उपस्थितात हास्याचे फवारे उडाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com