Udayanraje Bhosale: यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे घालणार मोदींना साकडं

Udayanraje Bhosale On Congress: "काँग्रेसने केवळ यशवंतरावांच्या नावाचा निवडणुकीपुरता वापर केला, पण त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत. एवढे मोठे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात होऊन गेले तरीदेखील काँग्रेसला त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची सुचले नाही."
Yashwantrao Chavan, Udayanraje Bhosale, Narendra Modi
Yashwantrao Chavan, Udayanraje Bhosale, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale : महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या मातीत अनेक चळवळी उदयास आल्या, त्यामध्ये स्त्री शिक्षण, सत्यशोधक समाज, प्रतिसरकार यांचे मोठे योगदान देशाच्या उभारणीत झाले आहे. दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनीदेखील देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. परकीय आक्रमणाच्या काळात त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रिपद भूषवले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे त्यामुळेच म्हटले जाते. यशवंत विचार हा लोककल्याणाचा विचार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस (Congress) पक्षाने त्यांच्या नावाचा केवळ निवडणुकीपुरता वापर केला, पण त्यांचे विचार आचरणात आणले नाहीत. एवढे मोठे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात होऊन गेले तरीदेखील काँग्रेसला भारतरत्न (Bharat Ratna) पुरस्कार देण्याची सुचले नाही. काँग्रेसला 'आउट ऑफ साइट आउट ऑफ माइंड' हे सूत्र लागू होतं. यशवंतरावांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे कर्तव्य आम्ही पार पडणार आहोत, असं उदयनराजे (Udayanraje Bhosale) म्हणाले.

तसेच काही लोकांनी स्वार्थापुरता यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा वापर केला, त्यांनाही यशवंतरावांना भारतरत्न द्यावा असे वाटले नाही, अशी टीका त्यांनी नाव न घेता काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत जाहीर सभा होणार आहे. या सभेतच यशवंतरावांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करणार असल्याचंही उदयनराजे म्हणाले.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com