Satara Loksabha 2024 : सातारच्या उमेदवारीबाबत शरद पवारांचं ‘वेट ॲण्ड वॉच’

Sharad Pawar News : महायुतीच्या उमेदवारावर ठरणार गणितं, मुंबईत जाणून घेतली पवारांनी इच्छुकांची मतं.
Sharad Pawar News
Sharad Pawar News Sarkarnama
Published on
Updated on

Satara Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची सातारा लोकसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी बुधवारी झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी सर्वांची मते जाणून घेतली. यामध्ये श्रीनिवास पाटील हेच प्रबळ दावेदार मानले जात असले तरी पक्षांतून त्यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे.

त्यामुळे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याची उत्सुकता आहे. महायुतीत सातारची जागा कोणाला सुटणार यावर खासदार शरद पवार आपला उमेदवार ठरवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पवारांनी आपला उमेदवार गुलदस्त्यात ठेवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्यासाठी बुधवारी मुंबइतील सिझन फोर हॉटेलवर बैठक झाली. या बैठकीस शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी साताऱ्यातून खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर हे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar News
Satara Loksabha News : भाजप, मनुवाद्यांच्या विरोधात एकत्र येण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार

सुरुवातीला सर्व इच्छुकांची मतं खासदार शरद पवार(Sharad Pawar) यांनी जाणून घेतली. यामध्ये सारंग पाटील, श्रीनिवास पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने यांनी आपापली भूमिका मांडून आपण सातारा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले.

सध्यातरी सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीत श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) हे प्रबळ दावेदार मानले जात असले तरी त्यांना पक्षांतर्गत विरोध होत आहे. त्यांच्या ऐवजी सारंग पाटलांना उमेदवारी देण्याची मागणी खुद्द श्रीनिवास पाटील यांनी पवार यांच्यापुढे केली आहे.

तर सुनील माने (Sunil Mane) यांनी तरुण उमेदवार म्हणून संधी देण्याची मागणी केली. सत्यजित पाटणकर यांनीही आपण इच्छुक असल्याचे सांगितले. यावेळी पाटणकरांकडून श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीस विरोध झाल्याचे सांगण्यात आले. खासदार शरद पवार यांनी सर्वांची मतं जाणून घेऊन निर्णय देण्याचे टाळले.

Sharad Pawar News
Kolhapur Lok Sabha Seat : 'शाहू महाराजांबद्दल आदर असेल तर बिनविरोध...' ; सतेज पाटलांचं विरोधकांना आव्हान!

कारण महायुतीत साताऱ्याची जागा कोणाकडे जाणार यावर खासदार शरद पवार (Sharad Pawar) आपला उमेदवार ठरविणार आहेत. त्यामुळे पवार यांनी वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात राहिले आहे. लवकरच बैठक घेऊन उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com