Udayanraje Bhosale Vs Shashikant Shinde: सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांच्यात झालेल्या काट्याच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या तुतारीने पहिल्यापासून घेतलेली आघाडी कायम आहे.
साताऱ्यात मोदींचा करिष्मा यावेळेसही चालला नाही. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले मागे पडले आहेत. साताऱ्यातील मतदारांनी खासदार शरद पवार यांचीच पाठराखण केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरु आहे. विधासभा मतदारसंघनिहाय मोजणी एकाचवेळी होत आहे. आतापर्यंत शरद पवार यांच्या पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी ११ हजारांचे मताधिक्य घेतले आहे.
शशिकांत शिंदेंना ६४ हजार ७१४ मते मिळालीआहेत. उदयनराजे भोसले यांना ५३ हजार ६४४ मते मिळाली आहे. उदयनराजे पिछाडीवर असून कराड उत्तर व कराड दक्षिणमधील मतदारांनीही याही वेळेस उदयनराजेंना साथ दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता सातारा व वाई येथे कोणाला मताधिक्य मिळणार याची उत्सुकता आहे. शशिकांत शिंदे सातारा व वाईत किती मताधिक्य घेणार याची उत्सुकता आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे चार आमदार असून पालकमंत्री शंभूराज देसाई व कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मकरंद पाटील यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीचे दोनच आमदार आहेत. यामध्ये बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. महायुतीची ताकत मोठी असूनही साताऱ्यात शरद पवारांचाच करिष्मा चालल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. पवारांचा संघर्ष योद्धा शशिकांत शिंदेंनी आघाडी घेतल्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्षात चैतन्याचे वातावरण आहे.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.