Satara Politics : महायुतीचे 8 आमदार, त्यात 4 मंत्री... शशिकांत शिंदे फ्रंटफूटवरून खेळणार; साताऱ्यासाठी स्ट्रॅटेजी तयार

Satara Politics : सातारा जिल्ह्यातील नऊ पालिका व एका नगरपंचायतीत भाजपसह महायुतीला टक्कर देण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनेल तयार होत असून स्थानिक पातळीवर राजकीय चुरस रंगणार असल्याचे चित्र आहे.
NCP (Sharadchandra Pawar) leader Shashikant Shinde, is preparing a united front to challenge the dominant Mahayuti alliance.
NCP (Sharadchandra Pawar) leader Shashikant Shinde, is preparing a united front to challenge the dominant Mahayuti alliance.Sarkarnama
Published on
Updated on

Satara Politics : जिल्ह्यातील ९ पालिका व एक नगरपंचायतींची निवडणूक होत आहे. यावेळी स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून ही निवडणूक होत असली, तरी पक्षीय पातळीवरून आपल्या विचारांची पालिकेत सत्ता यावी, म्हणून सर्वच पक्षांचे नेते आग्रही दिसत आहेत. महायुतीची बाजू जरा जड असल्याने त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रमुख पालिकेत पॅनेल टाकण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये सातारा, वाई, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, महाबळेश्वर, पाचगणी आणि मेढा नगरपंचायतीचा समावेश आहे. केवळ कऱ्हाड पालिकेबाबत माजी आमदार बाळासाहेब पाटलांच्या भूमिकेनंतरच निर्णय होणार आहे.

जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या आघाड्यांतच लढत होणार आहे; पण दोन्ही आघाड्यांकडून डावलेल्यांना यावेळी तिसरा पर्याय महाविकास आघाडीच्या माध्यमातून असणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांची पालिकानिहाय बैठका सुरू आहेत. यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्थानिक गटाचे सहकार्य मिळणार आहे. या माध्यमातून स्थानिक नेत्यांच्या आघाड्यांपुढे महाविकास आघाडी आव्हान उभे करणार आहे.

महाविकास आघाडीला कोणत्या पालिकेत किती उमेदवार मिळणार हा भाग असला, तरी मूळच्या दोन स्थानिक आघाड्यांकडून उमेदवारी न मिळालेल्यांना महाविकास आघाडीच्या पॅनेलचा आधार असेल. महाविकास आघाडीकडून सातारा, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, फलटण, म्हसवड या सात पालिकेत पॅनेल टाकण्याची तयारी सुरू केली आहे, तसेच मेढा नगरपंचायतीतही पॅनेल टाकले जाणार आहे. त्यासाठी काही स्थानिक इच्छुकांनी महाविकासच्या नेत्यांशीही संपर्क केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे इच्छुकांपुढे तिसऱ्या पॅनेलचा पर्याय निर्माण होणार आहे.

महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये कोण कोण असेल हा प्रश्न असून, त्यांचे कोणत्या पालिकेत पूर्ण पॅनेल होणार हे आगामी आठवडाभरात समजणार आहे; पण निवडून येण्याइतपत मते मिळविण्याचे आव्हान या पॅनेलच्या उमेदवारांपुढे असेल. सत्ताधारी स्थानिक नेत्यांच्या आघाड्यांपुढे या पॅनेलच्या माध्यमातून महाविकास आघाडी आव्हान उभे करत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. यामध्ये कितपत यश येणार हे आगामी काळात समजणार आहे.

NCP (Sharadchandra Pawar) leader Shashikant Shinde, is preparing a united front to challenge the dominant Mahayuti alliance.
Jaykumar Gore : राष्ट्रवादीच्या 9 शिलेदारांनी भाजपच्या मंत्र्याची झोप उडवली : जयकुमार गोरेंच्या बालेकिल्ल्यात 'हाय व्होल्टेज ड्रामा'

बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची :

महाविकास आघाडीत (MVA) राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांची युती आहे. त्यासोबत इतर छोटे, पक्ष संघटनांचाही यामध्ये समावेश आहे. आता शिवसेना व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची यासाठी राष्ट्रवादीला कितपत साथ मिळणार हे बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. केवळ कऱ्हाड आणि मलकापूर नगरपालिकेबाबत अद्याप भूमिका निश्चित झालेली नाही. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांची भूमिका काय राहणार यावर महाविकास आघाडीच्या पॅनेलचे भवितव्य अवलंबून असेल.

जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुकीत सर्व पालिकांत महाविकास आघाडी आपले पॅनेल टाकणार आहे. त्यासाठी घटक पक्षांच्या नेत्यांशी येत्या दोन दिवसांत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. त्यामध्ये पालिकानिहाय तयारी केली जाणार आहे. या माध्यमातून स्थानिक नेत्यांच्या आघाड्यांपुढे आव्हान उभे केले जाणार आहे.

- आमदार शशिकांत शिंदे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

NCP (Sharadchandra Pawar) leader Shashikant Shinde, is preparing a united front to challenge the dominant Mahayuti alliance.
Shashikant Shinde vs Shivendraraje : जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरविणाऱ्या गटासाठी 'टाईट फिल्डिंग'; शशिकांत शिंदे विरुद्ध शिवेंद्रराजेमध्ये 'कांटे की टक्कर'

पालिकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आमचे प्राधान्य असेल. त्यासाठी आमच्या घटक पक्षांशी बैठका होऊन त्यामध्ये निर्णय घेतला जाईल, तरीही शिवसेना म्हणून आम्ही सातारा, महाबळेश्वर, वाई, रहिमतपूर या पालिकांच्या निवडणुकीत स्वबळाचीही तयारी सुरू ठेवली आहे. येत्या दोन दिवसांत आम्ही पक्ष प्रमुखांशी चर्चा करून त्यांच्या सूचनेनुसार निर्णय घेणार आहोत.

- प्रा. डॉ. नितीन बानुगडे पाटील, (उपनेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com