दोन राजेंना सत्तेबाहेर करण्याचा शिंदेंचे निर्धार : 'सातारा शहर महाविकास आघाडी' मैदानात

Shashikant Shinde | Chhtrapati Udayanraje Bhosale | Shivendra raje Bhosale : पारंपरिक राजकारणाला भेदणारा पर्याय देण्‍याचा संकल्‍प
Shashikant Shinde | Chhtrapati Udayanraje Bhosale | Shivsendra raje Bhosale
Shashikant Shinde | Chhtrapati Udayanraje Bhosale | Shivsendra raje BhosaleSarkarnama

सातारा : आगामी सातारा (Satara) नगरपालिकेच्‍या निवडणूक रिंगणात सातारा शहर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) उतरविण्‍याचा निर्णय आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्‍या उपस्‍थितीत झालेल्‍या बैठकीत आज घेण्‍यात आला. या महाविकास आघाडीमुळे आगामी निवडणुकीत सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडीला तगडा पर्याय उभा राहण्याच्या शक्‍यता निर्माण झाली आहे. (Satara | NCP | Latest news)

सातारा शहराच्‍या राजकारणात मागील अनेक वर्षांपासून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यात संघर्ष होत आहे. या दोन्‍ही राजेंच्या आघाड्यांच्‍या पारंपरिक सत्ता संघर्षाला भेदण्‍याचा प्रयत्न अनेकांनी केला, मात्र त्‍याला फारसे यश आले नाही. मात्र राष्‍ट्रवादीत असणारे दोन्‍ही नेते भाजपमध्‍ये गेल्‍याने या ठिकाणी राष्‍ट्रवादीचे नेतृत्‍व उभे करण्‍यासाठीची संधी तयार झाली आहे. ती संधी साधत आगामी पालिका निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे हे सक्रिय होतील, अशी चर्चा गेली अनेक महिने सातारा शहरात सुरू होती.

या चर्चेला बळकटी देणारी बैठक आज शिंदे यांच्याच उपस्‍थितीत पार पडली. या बैठकीसाठी राज्‍यातील महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे पदाधिकारी, तसेच माजी उपाध्‍यक्ष ॲड. बाळासाहेब बाबर, शहर सुधार समितीचे अस्‍लम तडसरकर, ज्ञानदेव कदम, विजय निकम, प्रा. विक्रांत पवार, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, प्रणव सावंत, अमर गायकवाड, गिरीश मोडकर, स्‍नेहा अंजलकर, सलीम कच्‍छी, अमित कदम, अमृता पाटील, रावण गायकवाड, मोहनीस शेख, राहुल यादव, नंदकुमार कवारे व इतर नागरिक उपस्‍थित होते. (Satara | NCP | Latest news)

तिसरा पर्याय देण्याचा संकल्प

या बैठकीत सातारा शहराच्‍या विकासाच्‍या अनुषंगाने चर्चा झाल्‍यानंतर सातारा शहर महाविकास आघाडी निर्माण करण्‍यावर उपस्‍थितांनी सहमती दर्शवली. त्यानुसार आगामी काळात पारंपरिक राजकारणाला भेदणारा पर्याय देण्‍याचा संकल्‍प करण्‍यात आला. निवडणुकीच्या तोंडावर या महाविकास आघाडीची घोषणा झाल्‍याने आगामी काळात त्‍याचे साताऱ्याच्‍या राजकारणात काय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com