सातारा पोलिसांनी सदावर्तेंना घेतलं ताब्यात; दीड वर्षांपुर्वीचं वक्तव्य भोवणार

मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी त्यांच्यावर दीड वर्षांपुर्वी साताऱ्यात गुन्हा दाखल झाला होता.
Gunratna Sadavarte
Gunratna SadavarteSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak ) या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना दीड वर्षांपुर्वीचं प्रकरण भोवणार आहे. मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी त्यांच्यावर दीड वर्षांपुर्वी साताऱ्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यात आता सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे.

सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना आर्थर रोड तुरुंगात ताब्यात घेतलं असून साताऱ्याकडे रवाना झाले आहेत. तिथे त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाईल. सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी एका वृत्तवाहिनीवर बेताल वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नव्हती.

Gunratna Sadavarte
Silver Oak Attack : असा ठरला प्लॅन! अभिषेक अन् संदीपची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

सिल्वर ओक हल्लाप्रकरणात सदावर्ते यांना अटक केल्यानंतर सातारा पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी मुंबईत आले होते. मुंबई सत्र न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने त्यांचा ताबा घेण्याची परवानगी सातारा पोलिसांना दिली आहे. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सदावर्ते यांचा मुक्काम आता साताऱ्यात असणार आहे.

दरम्यान, सदावर्ते यांची पोलीस कोठडी बुधवारी संपत होती. त्यासाठी पोलिसांनी त्यांनी सत्र न्यायालयात हजर करून कोठडीत वाढ कऱण्याची मागणी केली. पण सदावर्ते यांच्या वकिलांनी त्यास जोरदार विरोध केला. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. पण आता इतर प्रकरणांची कलमेही यात वाढवली जात असून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने ही बाजू ग्राह्य धरून सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांना शनिवार 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Gunratna Sadavarte
समीर वानखेडेंसोबत काम केलेल्या अमित गवाटेंकडे केंद्राकडून 'एनसीबी'ची जबाबदारी

पोलिसांनी बुधवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह अभिषेक पाटील, कृष्णात मोरे, सच्चिदानंद पुरी, चंद्रकांत सुर्यवंशी, ताज्जुदीन शेख आणि इतर आरोपींना न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी नागपूरमधील व्यक्तीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. आंदोलनाशी संबंधित काही अॉडिओ क्लिपही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. सुर्यंवशीच्या तपासात रात्री ११ ते पहाटे २:५० पर्यंत सदावर्तेंच्या इमारतीच्या टेरेसवर जयश्री पाटील, नागपूरची व्यक्ती, आणि इतरांची बैठक झाली. या बैठकीत जयश्री पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केले, त्याही आरोपी असून सध्या फरार आहेत. ८ एप्रिल रोजी सदावर्तेंनी नागपूरच्या व्यक्तीला फोन केला होता. त्यावेळी ती व्यक्ती मुंबईतच होती. आंदोलन नागपूरची व्यक्ती हाताळत होती, अशी माहिती घरत यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com