Kolhapur Politics News : महाडिकांचे शेवटचे सत्तास्थान हिसकावण्यासाठी सतेज पाटलांनी सर्व शक्ती लावली पणाला; पण...

Satej Patil News : कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Satej Patil, Dhananjay Mahadik
Satej Patil, Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Satej Patil, Dhananjay Mahadik News : कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस (Congress) नेते माजी मंत्री सतेज पाटील आणि भाजप नेते खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) पुन्हा आमने-सामने आले आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे.

महाडिक कुटुंबाच्या हातातले शेवटचे सत्ताकेंद्र मिळवण्यासाठी सतेज पाटील (Satej Patil) यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्याना आधीच दोन झटके बसले आहेत. तर आपली 25 वर्षांची सत्ता अबाधित राखण्यासाठी महाडिक कुटुंब तितक्याच ताकदीने आखाड्यात उतरले आहे. कोल्हापुरात या निवडणुकीच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे.

Satej Patil, Dhananjay Mahadik
Pune Politics : एकमेकांवर तोंडसुख घेणारे दिलीप मोहिते-आढळराव पाटील रंगले हास्यविनोदात!

राजाराम सहकारी साखर कारखाना, गोकूळ, ही कोल्हापूरच्या राजकारणातली महत्त्वाची सत्ताकेंद्रे आहेत. इथे ज्यांची सत्ता असते त्यांचा जिल्ह्याच्या राजकारणात वरचस्मा असतो. एकेकाळी ही सर्व सत्ताकेंद्र महाडिक कुटुंबाच्या ताब्यात होती. संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणातही महाडिकांचा शब्द महत्त्वाचा होता.

मात्र, 2015 ला महाडिकांच्या वर्चस्वाला पहिला हादरा बसला. 18 वर्ष विधान परिषदेतली काँग्रेसकडून मिळालेली आमदारकी गेली. पाटलांनी महादेवरावांचा पराभव केला. याआधी 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या (BJP) अमल महाडिकांनी काँग्रेसकडून लढलेल्या सतेज पाटलांचा पराभव केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये धनंजय महाडिकांचा पराभव झाला. त्याच बरोबर सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत अमल महाडिकांचा पराभव केला.

यानंतर बंटी पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते माजी मंत्री हसन मुश्रीफांना सोबत घेत गोकूळ ताब्यात घेतले. यामुळे महाडिकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर मात्र, धनंजय महाडिक यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत बाजी मारली आणि महाडिक कुटुंबाला विजय मिळाला. सतेज पाटलांनीही राजारामसाठी जय्यत तयारी केली. राजारामच्या निवडणुकीत मागीलवेळी सतेज पाटलांचा थोडक्यात पराभव झाला होता. तेव्हापासूनच सतेज पाटलांनी या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मात्र, आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी महाडिक कुटुंबही ताकदीने मैदानात उतरले आहे.

Satej Patil, Dhananjay Mahadik
Chandrashekhar Bawankule : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत बावनकुळे म्हणतात, 'चर्चा थांबवा..'

राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले या तालुक्यांतील 122 गावांमध्ये आहे. या कारखान्यासाठी 13 हजार 538 मतदार मतदान करणार आहेत. कारखान्याच्या 21 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. राजारामच्या प्रचाराची सूत्रे माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक असा सामना बघायला मिळत आहे. मात्र, त्याआधीच बंटी पाटलांना दोन झटके बसले आहेत.

कार्यक्षेत्राबाहेरील गावातले सभासद अपात्र ठरवण्यासाठी सतेज पाटलांनी न्यायालयीन लढा दिला. मात्र, त्यांना अपयश आले आहे. दुसरीकडे अर्ज छाननीतही पाटील गटाचे 29 अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे त्यांना दोन घक्के बसले आहेत. ही निवडणूक महाडिक कुटुंबासाठी महत्त्वाची आहे. सलग 30 वर्षांपासून कारखाना महाडिकांच्या ताब्यात आहे. इथली सत्ता गेली, तर महाडिकांच्या राजकारणाला मोठा धक्का बसेल. दुसरीकडे सतेज पाटलांनी राजाराममध्येही सत्ता मिळवली, तर तेच जिल्ह्याचे सर्वसमावेश नेतृत्व म्हणून पुढे येतील. त्यामुळे दोन्ही गटामध्ये जोरदार रस्सीखेच पाह्यला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com