Pune Graduate Election : भाचीला भाजपची उमेदवारी : मामा सतेज पाटील मात्र महाविकास आघाडीचाच प्रचार करणार : एकाच वाक्यातच विषय संपवला

Satеj Patil on Pune Graduate Election : डॉ. स्मिता जाधव या डॉ.डी. वाय. पाटील ग्रुपच्या प्र-कुलगुरू आणि आमदार सतेज पाटील यांच्या सख्ख्या भाची आहेत. त्यामुळे सहाजिकच सतेज पाटील यांच्या भूमिकेवर घाव घालण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे.
Dr. Smita Jadhav, Satеj Patil
Dr. Smita Jadhav, Satеj PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Graduate Election : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघामधून भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे. मागील वर्षभरापासून शरद लाड यांचे नाव चर्चेत असताना, ते तयारी करत असताना अचानक त्यांना डावलून जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, जाधव यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांची कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आल्याची चर्चा आहे.

स्मिता जाधव या डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपच्या प्र-कुलगुरू आणि आमदार सतेज पाटील यांच्या सख्ख्या भाची आहेत. त्यामुळे सतेज पाटील आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार की भाचीचा असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपचाही यामागे हाच प्लॅन असल्याचे बोलले जाते. मात्र सतेज पाटील यांनी कोल्हापूरी बाण्याने भाजपवर हल्लाबोल करत महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे जाहीर केले आहे.

पुणे येथे बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, भाजपकडून नेहमीच घर फोडण्याचा अजेंडा ठेवला जातो. मात्र त्याचा काहीही परिणाम होणार नाही. शिक्षक मतदारसंघातून आमदार जयंत आसगांवकर तर पुणे पदवीधर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदंचद्र पवार पक्षाचं आहे. तो पक्ष आज उमेदवार जाहीर करेल. जो कोणीही उमेदवार देतील. त्यांना निवडून आणण्यासाठी ताकदीने मैदानात उतरणार आहे. पक्षाच्या भूमिकेला अधीन राहून पुढचे 20 दिवस माझे काम असल्याचे जाहीर केले.

Dr. Smita Jadhav, Satеj Patil
Satara Crime : शिक्षक पित्याने रागाच्या भरात पोटच्या मुलीला संपवलं; साताऱ्यात टीव्ही-मोबाईलचा वाद जीवावर बेतला

गत मागील शिक्षक व पदवीधर निवडणुकीत सतेज पाटील यांची भूमिका महत्वाची भूमिका होती. जयंत आसगावकर आणि अरुण लाड यांच्या विजयात सतेज पाटलांचा वाटा होता. तसेज महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत सतेज पाटील यांना मिळालेले यश आणि आजही गोकुळच्या निवडणुकीत निमित्ताने महायुतीच्या नेत्यांना जेरीस आणण्याचे काम सतेज पाटील यांचे सुरु आहे. मात्र सतेज पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कोण अडचणीत येणार हे पहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com