सतेज पाटलांची भाजप नेत्याबरोबर बंद खोलीत चर्चा!

कुरुंदवाड पालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपच्या नगरसेवकांचीही पाटील यांनी भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा केली.
Satej patil
Satej patilSarkarnama
Published on
Updated on

कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) : कोल्हापूर विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज (ता. १४ नोव्हेंबर) कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांची भेट घेतली. या वेळी डांगे यांच्याबरोबर त्यांनी बंद खोलीत चर्चा केली. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपच्या नगरसेवकांचीही पाटील यांनी भेट घेऊन निवडणुकीबाबत चर्चा केली. विधान परिषदेसाठी कुरुंदवाड नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्यासह २० मतदार आहेत. (Satej Patil discuss to BJP leader closed door in Kurundwad)

नगराध्यक्ष जयराम पाटील हे पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय असून कॉँग्रेसची ९ मते पक्की अ‍ाहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाच, तर भाजपकडे सहा मते आहेत. सतेज पाटील यांनी आज सर्वप्रथम नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या निवासस्थांनी आले. तेथे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची भेट घेत चर्चा करून मतदानाचे आवाहन केले. भाजप नगरसेवकांचे कुटुंबीय तेथे उपस्थित होते. त्यानंतर ज्येष्ठ नेते रावसाहेब ऊर्फ दा. आ. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर भाजप नेते रामचंद्र डांगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत बंद खोलीत २० मिनिटे चर्चा केली. माजी नगराध्यक्ष डांगे यांनीही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गतनिवडणुकीत डांगे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असतानाही विधान परिषद निवडणुकीत महाडिक यांच्या बाजूने होते.

Satej patil
राज्यमंत्री यड्रावकर आमच्यासोबतच; त्यांच्याशी कोणतेही मतभेद नाहीत

कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत सतेज पाटील यांनी कॉंग्रेससाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात पालकमंत्री यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली होती. मात्र, आज पाटील यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीसह भाजप नगरसेवकांच्या भेटी घेत सर्वांनाच धक्का दिला. या वेळी भाजपचे रामदास मधाळे, दयानंद मालवेकर, अजीम गोलंदाज, उदय डांगे, सुजाता डांगे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Satej patil
प्रकाश आवाडेंनी भाजपला पाठिंबा देताच सतेज पाटील कल्लाप्पाण्णांच्या भेटीला!

या भेटी दरम्यान गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंगेजखान पठाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय जयराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी आलासे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, शिरोळ तालुका शिवसेना प्रमुख वैभव उगळे, ज्येष्ठ नेते धनपाल आलासे, बाबासाहेब सावगावे, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, पप्पू पाटील, सुनील गायकवाड, प्रवीण खबाले, अजित देसाई, रमेश भुजूगडे, अभिजीत पाटील, बंडू पाटील, बाबासो भबिरे, चंद्रकांत पवार, प्रवीण खबाले या मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com