Satej Patil News : ...नाहीतर 'ते' फोटो व्हायरल करेन; सतेज पाटलांचा मंडलिकांना इशारा, नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Lok Sabha Election : आम्ही राजकारणात कसलेले पैलवान आहोत. शड्डू ठोकून मैदानात उतरलोय त्यामुळे पुढचा पैलवान कोणीही असो त्याला घाबरत नाही. माती एकदा अंगावर घेतली तर पुढच्याला चितपट केल्याशिवाय गप्प बसणार नाही
Sanjay Mandalik, Satej Patil
Sanjay Mandalik, Satej Patilsarkarnama

Kolhapur Political News : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे रण आरोप-प्रत्यारोपांनी चांगलेच तापले आहे. एकमेकांची उणीदुणी काढत प्रतिस्पर्धी उमेदवाराची कोंडी कशी करता येईल, यासाठी षडयंत्र रचले जात आहे. जुन्या गोष्टी उगाळून लोकसभेच्या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण करण्यासाठीही प्रयत्न होत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे.

कोल्हापूरमध्ये Kolhapur महायुतीकडून थेट शाहू छत्रपतींवर वैयक्तिक हल्ले होऊ लागले आहेl. यावरून काँग्रेस नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी संजय मंडलिकांना त्यांचे फोटो व्हायरल करण्याचा इशारा दिला आहे. सतेज पाटलांच्या या इशारानंतर कोल्हापूरसह राज्यातील लोकांना ते नेमके प्रकरण आहे तरी काय, याची उत्सुकता लागली आहे. Satej Patil Warns Sanjay Mandlik.

महाविकास आघाडीतील काँग्रेसने शाहू छत्रपती Shahu Chhatrapati लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे खासदार संजय मंडलिकांनी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरच्या गादीबद्दल काही लोक प्रश्न करत आहेत, असे ते ठिकठिकाणी बोलत आहेत. यावर काँग्रेसचे नेते चांगलेच भडकल्याचे दिसून येत आहे. पाटलांनी मंडलिकांना फोटो व्हायरल करण्याचा थेट इशाराच दिल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

Sanjay Mandalik, Satej Patil
Ajit Pawar : 'कॉमन मॅन'साठी नियम, दंड सर्व काही, उलट्या दिशेने जाणाऱ्या अजितदादांना मात्र चक्क सूट; दिमतीला पोलिसही

सतेज पाटील म्हणाले, मी संजय मंडलिक Sanjay Mandlik यांना सातत्याने सांगतो की गादीवर बोलू नका. बंटी पाटलावर बोला, काही अडचण नाही. हा पाटील तुम्हाला उत्तर द्यायला खंबीर आहे. तुम्ही शाहू महाराजांचा सन्मान राखा. दरम्यान, 2019 ला तुम्ही निवडणुकीला उभा होतात. त्यावेळी महाराजांच्या पाया पडायला गेला होता. त्यांच्या पाया पडतानाचे तुमचे फोटो माझ्याकडे आहेत. ते व्हायरल करेन. त्यामुळे तुमची अडचण होईल, असेही पाटील म्हणाले.

सतेज पाटलांनी Satej Patil मंडलिकांना पराभूत करणार असल्याचा चंग बांधला आहे. शाहू छत्रपतींना त्यासाठी विविध रणनीती ते आखत आहेत. शाहू महाराजांवर न बोलता आमच्यावर टीका करा. आम्ही राजकारणात कसलेले पैलवान आहोत. शड्डू ठोकून मैदानात उतरलोय त्यामुळे पुढचा पैलवान कोणीही असो त्याला घाबरत नाही. माती एकदा अंगावर घेतली तर पुढच्याला चितपट केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा थेट इशारा पाटलांनी मंडलिकांना दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sanjay Mandalik, Satej Patil
Raju Shetti News : मी तुमच्या शेतातील म्हसोबा, मला...; राजू शेट्टींचं शेतकऱ्यांना साकडं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com