Satyajeet Tambe News : अखेर सत्यजीत तांबेंची राजकीय भूमिका ठरली; यापुढे ना काँग्रेस ना भाजप : अपक्षच राहणार

Nashik Graduate Election : सत्यजीत तांबे यांचे काँग्रेसवर धक्कादायक आरोप
Satyajeet Tambe Latest News
Satyajeet Tambe Latest NewsSarkarnama

Satyajeet Tambe News : नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत सगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर आज (ता. ४) आमदार सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रचं दाखवली. हेतूपरस्परपणे आमची बदनामी केली, असा आरोप तांबे यांनी केला. तसेच त्यांनी यावेळी आपली पुढील भूमिका जाहीर केली.

या वेळी तांबे म्हणाले, 'नाशिक पदवीधर निवणुकीत (Nashik Graduate Election) गेली २० ते २५ दिवस अनेक घडामोडी घडल्या, अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे याविषयावर बोलायचे होते. किती निष्ठेने पक्षामध्ये काम केले. मी २००० मध्ये काँग्रेसच्या (Congress) एनएसयूआय संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलो. अनेक वर्ष पक्षात काम करत आहे. चळवळीतून काम करत आलो आहे, असे सांगत त्यांनी यावेळी सांगितले.

Satyajeet Tambe Latest News
Satyajit Tambe News : सत्यजीत तांबेंचे पत्रकार परिषदेत थेट कागदपत्र दाखवत धक्कादायक आरोप

मी काँग्रेस सोडलेली नाही. परंतु आता मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. त्यामुळे यापुढेही अपक्षच राहणार आहे. मला अनेक संघटनांनी आणि पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे मी आता अपक्षच राहणार आहे, असे सांगत सत्यजीत तांबे यांनी पुढील भूमिका जाहीर केली.

यावेळी तांबे यांनी प्रदेश काँग्रेसवर विविध आरोप केले. एबी फॉर्म प्रदेश काँग्रेसने चुकीचे दिली. आम्हाला पक्षातून बाहेर घालवण्यासाठी प्रयत्न केले, असा धक्कादायक आरोप तांबे यांनी केला. आमच्या माध्यमातून ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आण्याचा प्रयत्न केला, असे आरोप तांबे यांनी केले.

या वेळी तांबे म्हणाले, पदवीधरची निवडणूक जवळ आली तेव्हा पुस्तक प्रकाशनाला मी अनेक नेत्यांना बोलावले होते. मुख्ममंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाला बोलावले होते. त्या कार्यक्रमाला फडणवीस आले होते. मला संधी मिळत नाही, हे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध आहेत. ते माझे मोठे भाऊ असल्यासारखे आहेत.

संघटना आणि पक्ष मला संधी देऊ शकत नाही. त्यामुळे वडिलांनी सांगितले की, ही निवडणूक तू लढवली पाहिजे. घरामध्ये चर्चा केली. त्या चर्चेमध्ये थोरात साहेब होते. त्यावेळी ठरले की सत्यजीत यांनी लढावे. मात्र, त्यावेळी माझी मानसिक तयारी नव्हती. त्या प्रमाणे आम्ही पक्षाच्या नेत्यांना सगळे सांगितले होते की, आम्ही वेळेवर निर्णय घेऊ, त्या प्रमाणे एच. के. पाटील यांनी सांगितले की, दोघांपैकी कोणाला लढायचे यांचा निर्णय घ्या.

Satyajeet Tambe Latest News
Kasba By Election : भाजप ठरलं कसब्यातून रासनेंना उमेदवारी; धंगेकरांच्या नावाची फक्त औपचारीकताच बाकी?

माझा माणूस १० जानेवारीपासून सकाळपासून प्रदेश कार्यालयात बसून राहिला. दोन एबी फॉर्म घेऊन आमचा माणूस घेऊन आला. फॉर्म भरायला सुरुवात केली. एबी फॉम बघितल्यावर कळाले की, हे फॉर्म आमचे नव्हते. त्यामध्ये एक औरंगाबादचा आणि एक नागपूरचा एबी फॉर्म होता, असे धक्कादायक सत्य सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच त्यांनी प्रदेश काँग्रेसवर आरोप केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com