Satyajeet Tambe News : नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत सगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर आज (ता. ४) आमदार सत्यजीत तांबे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रचं दाखवली. हेतूपरस्परपणे आमची बदनामी केली, असा आरोप तांबे यांनी केला.
यावेळी तांबे म्हणाले, 'नाशिक पदवीधर निवणुकीत गेली २० ते २५ दिवस अनेक घडामोडी घडल्या, अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे याविषयावर बोलायचे होते. किती निष्ठेने पक्षामध्ये काम केले. मी २००० मध्ये काँग्रेसच्या (Congress) एनएसयूआय संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलो. अनेक वर्ष पक्षात काम करत आहे. चळवळीतून काम करत आलो आहे.
अध्यक्ष पदावर काम केल्यानंतर वेगवेगळ्या पदावर संधी दिली जाते. मात्र, मी ज्यावेळी पक्षाच्या नेत्यांकडे मला संधी द्या, असे म्हणत होतो, तेव्हा तुमच्या घरात तुमचे वडील आमदार आहेत, असे सांगितले जात होते. मी एच. के. पाटील यांनाही सांगितले होते की, मला संधी द्या, मात्र संधी मिळाली नाही. मला सांगण्यात आले की, तुम्ही तुमच्या वडिलांच्या जागेवर निवडणूक लढवा, त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की, मला वडिलांच्या जागेवर लढण्याची इच्छा नाही.
पदवीधरची निवडणूक जवळ आली तेव्हा पुस्तक प्रकाशनाला मी अनेक नेत्यांना बोलावले होते. मुख्ममंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाला बोलावले होते. त्या कार्यक्रमाला फडणवीस आले होते. मला संधी मिळत नाही, हे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध आहेत. ते माझे मोठे भाऊ असल्यासारखे आहेत.
संघटना आणि पक्ष मला संधी देऊ शकत नाही. त्यामुळे वडिलांनी सांगितले की, ही निवडणूक तू लढवली पाहिजे. घरामध्ये चर्चा केली. त्या चर्चेमध्ये थोरात साहेब होते. त्यावेळी ठरले की सत्यजीत यांनी लढावे. मात्र, त्यावेळी माझी मानसिक तयारी नव्हती. त्या प्रमाणे आम्ही पक्षाच्या नेत्यांना सगळे सांगितले होते की, आम्ही वेळेवर निर्णय घेऊ, त्या प्रमाणे एच. के. पाटील यांनी सांगितले की, दोघांपैकी कोणाला लढायचे यांचा निर्णय घ्या.
माझा माणूस १० जानेवारीपासून सकाळपासून बसून राहिला. दोन एबी फॉर्म घेऊन आमचा माणूस घेऊन आला. फॉर्म भरायला सुरुवात केली. एबी फॉम बघितल्यावर कळाले की, हे फॉर्म आमचे नव्हते. त्यामध्ये एक औरंगाबादचा आणि एक नागपूरचा एबी फॉर्म होता, असे धक्कादायक सत्य सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.