सत्यजित तांबे म्हणाले, आमचा नेमका मित्र कोण हे कळत नाही

काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे ( Satyajeet Tambe ) व राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे ( Kiran Lahamte ) काल ( रविवारी ) एकाच व्यासपीठावर दिसून आले.
Satyajit Tambe
Satyajit Tambe Sarkarnama

संगमनेर ( जि. अहमदनगर ) - अकोले नगर पंचायतची निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढविली तर काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे ( Satyajeet Tambe ) व राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे ( Kiran Lahamte ) काल ( रविवारी ) एकाच व्यासपीठावर दिसून आले. मालेगाव येथील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमिवर ही भेट महत्त्वाची ठरली. ( Satyajit Tambe said, "I don't know who our real friend is." )

तालुक्यातील आंबी खालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्यजित तांबे बोलत होते. तांबे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आमचा मित्र पक्ष आहे, मात्र राज्यात सर्वत्र त्यांचा आमच्याशीच प्रॉब्लेम का ? त्यामुळे आमचा नेमका मित्र कोण हे कळत नाही, असे म्हंटल्याने नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Satyajit Tambe
काँग्रेस २०२४ मध्ये मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का..? सत्यजित तांबे म्हणाले...

या सोहळ्याला अकोले तालुका राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे, पाटोदा गावाचे आदर्श सरपंच भास्कर पेरे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, शिवसेनेचे जनार्दन आहेर, आंबी दुमालाचे सरपंच जालिंदर गागरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com