Desai Vs Patankar : ''50 खोके घेऊनही ज्यांचे पोट भरले नाही, अशी मंडळी आता...'' ; सत्यजितसिंह पाटणकरांचा आरोप!

Patan Politics News : मंत्री शंभूराज देसाईंवर नाव न घेता साधला आहे निशाणा; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले?
Satyajitsingh Patankar
Satyajitsingh PatankarSarkarnama
Published on
Updated on

विशाल पाटील -

Satara News : पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यानंतर आता दुसरा पाटण शुगरकेन इंडस्ट्रीज कारखाना शेतकऱ्यांसाठी उभारला गेला असून, पाटण शुगरकेनच्या पहिल्या रोलर पूजनालाच पाटणकर आणि देसाई गटातील पारंपरिक राजकारण रंगणार असल्याची प्रचिती येत आहे.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका करत लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा राजकीय अड्डा बनवला असल्याचे म्हटले आहे, तर मंत्री शंभूराज देसाई यांचे नाव न घेता 50 खोके घेऊनही ज्यांची पोटं भरलेली नाहीत, अशी मंडळी आता टक्केवारीच्या माध्यमातून जनतेची लूट करत असल्याचा आरोप सत्यजितसिंह पाटणकरांनी केला आहे. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satyajitsingh Patankar
Bidri Sugar Factory Election : ‘बिद्री’च्या निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम; मुश्रीफ-घाटगे, महाडिक-पाटील आमने सामने

पाटण शुगरकेन इंडस्ट्रीज या साखर कारखान्याचे पहिले रोलर पूजन व शेतकरी मेळावा नुकताच झाला. या वेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते तथा पाटण शुगरकेन इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यजितसिंह पाटणकर होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राजेश पवार, राष्ट्रवादीचे पाटण विधानसभा अध्यक्ष राजाभाऊ शेलार, टाटा मोटर्स कामगार नेते सुजित पाटील, तालुका दूध संघाचे अध्यक्ष सुभाषराव पवार, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, श्रीराम नागरी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी माजी बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ''पाटण तालुक्यासह स्थानिक शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. या संकल्पनेतून आम्ही मंडळींनी घाम गाळून लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची निर्मिती केली होती. मात्र, तिथे केवळ राजकीय अड्डा व स्थानिकांची गळचेपी होत असल्याने तालुक्यातील प्रामाणिक व स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या हितासाठीच पाटण शुगरकेन या नवीन साखर कारखान्याची निर्मिती केली आहे. माझ्या जिवात जीव असेपर्यंत तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान गहाण टाकू देणार नाही.''

Satyajitsingh Patankar
Shambhuraj Desai - Fadnavis : भाजप खासदारांच्या वक्तव्यामुळे नाराज मंत्री शंभूराज देसाई फडणवीसांची भेट घेणार

याशिवाय ''आम्ही देसाई कारखान्यापेक्षा उसाला ज्यादा दर, वेळेत तोड, स्वाभिमानाची वागणूक, काटामारी न करता प्रामाणिक मोबदला दिला जाईल. विरोधकांना कारखान्याची मापं काढण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. स्वतःचा कारखाना चांगल्याप्रकारे चालवता आला नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता एवढीच त्यांची ध्येयधोरणं आहेत. जनतेचा पैसा हा जनकल्याणासाठीच वापरला गेला पाहिजे, '' असंही पाटणकर म्हणाले.

Satyajitsingh Patankar
Maratha Reservation : मंत्री मुश्रीफांनी भुजबळांचे कान टोचले; कुणबी दाखले योग्य, की अयोग्य ठरविण्याचा अधिकार समितीला

याचबरोबर ''विकासकामांतील टक्केवारी पाहता एका वर्षातच त्या कामांची होणारी धूळधाण आणि पन्नास खोकी घेऊनही ज्यांची पोट भरलेली नाहीत अशी मंडळी आता टक्केवारीच्या माध्यमातून जनतेची लूट करत आहेत. हे सर्व थांबवायचे असेल तर आता स्वाभिमानी जनतेने पुढे येऊन सार्वत्रिक परिवर्तन करणे ही काळाची गरज बनली आहे,'' असंही या वेळी सांगण्यात आलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com