Loksabha Election2024 : सातारा लोकसभा उमेदवारांसाठी चाचपणी; शरद पवार गट ग्राऊंडवर उतरला

Political News : राष्ट्रवादीतील फूटीनंतरही शरद पवार गटाकडून अनेक नावे चर्चेत
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Satara News : लोकसभा 2024 निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात, त्यामुळे उमेदवारी चाचपणी करण्यासाठी आता शरद पवार गट ग्राऊंडवर उतरला आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यासाठी इच्छुक भावी खासदार ताकद दाखविण्यासाठी तयारीला लागले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात पाटण आणि कराड तालुक्यात मेळावे घेण्यात येणार असून यामध्ये उमेदवारांची चाचपणी होणार आहे. राष्ट्रवादीतील फूटीनंतरही शरद पवार गटातून अनेक नावे चर्चेत असून त्यापैकी कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.      

सातारा लोकसभा मतदारसंघ 1999 पासून राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा उमेदवारच गेल्या 24 वर्षात साताऱ्यात निवडून आला आहे.

Sharad Pawar
Maratha Reservation : मंत्रिपदाचा कधीच राजीनामा दिलाय; भुजबळांनी जाहीरपणे सांगून टाकलं

गेल्या 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत सव्वा लाखांच्या फरकांनी मतांनी विजयी होणाऱ्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची साथ सोडली अन् त्यांना 87 हजार 717 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ऐनवेळी मैत्रीखातर मैदानात उतारलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर विजय मिळवला.

आता राष्ट्रवादीत फूट पडल्याने भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात आहे. अशावेळी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या विचारांचा खासदार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी सुरू केली आहे.   

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटण विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी 11 वाजता श्रीराम मंदिरात तर दुपारी 1 वाजता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उंब्रज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jaynat Patil), माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने व पक्षाचे मान्यवर पदाधिकारीही उपस्थित असणार आहेत .

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेसाठी शरद पवार गटातील चर्चेतील नावे

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून पक्ष फूटीनंतरही खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas patil), जिल्हाध्यक्ष सुनील माने, खासदार पुत्र सारंग पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांची नावे चर्चेत आहेत. खासदार श्रीनिवास पाटील वयोमानानुसार निवडणूक लढवतील की नाही याबाबत संदिग्धता असल्याने अनेक नवे तरूण चेहरे चर्चेत आले असून भावी खासदार होण्यासाठी तयारीला लागले आहेत.

(Edited by Sachin Waghmare)

Sharad Pawar
Sharad Pawar : ठाकरे गटाची पहिली परीक्षा शरद पवारच घेणार!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com