Shahaji Patil: शहाजी पाटलांनी डाव टाकला; शेकापला मोठा दणका; शिवसेनेची ताकद वाढणार...

Sangola Politics: आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजी पाटील यांनी शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.‌
Shahaji Patil News
Shahaji Patil NewsSarkarnama

Pandharpur: शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (shahaji bapu patil latest marathi news) यांनी सांगोला (Sangola) तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा दणका दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शेकापच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे सांगोला तालुक्याच्या उत्तर भागात शहाजी पाटील यांची ताकद वाढली आहे.‌(Latest Marathi News)

सांगोला तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या महुद ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी लुंबाळ यांच्यासह शेकापच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे सांगोल्यात शिवसेनेची शक्ती वाढणार आहे.‌

महुद ग्रामपंचायतीवर मागील अनेक वर्षांपासून शेकापचे वर्चस्व होते. आमदार शहाजी पाटील यांनी यानिमित्ताने शेकापच्या वर्चस्वाला खिंडार पाडले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजी पाटील यांनी शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख (dr babasaheb deshmukh) यांच्यासमोर तगडे आव्हान उभे केले आहे.‌

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेकाप आणि आमदार पाटील गट हे सांगोल्यामध्ये पारंपरिक विरोधक आहेत. नुकत्याच झालेल्या महिला सूतगिरणीच्या निवडणुकीमध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का बसला होता. सूतगिरणीच्या सर्व 21 जागांवर शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पॅनेलने बाजी मारली होती. विधानसभेपूर्वीच शेकाप कार्यकर्त्यांनी शहाजी बापू पाटील गटाला सूतगिरणीच्या निवडणुकीत व्हाइटवॉश दिला आहे.

बाबासाहेब देशमुख हे कै. गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर राजकारणात सक्रिय झाले. बाबासाहेब देशमुख हे उच्च शिक्षित असून, गेल्या पाच वर्षांपासून सांगोल्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महिला सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीत प्रथमच प्रचंड यश मिळवलं आहे.

Shahaji Patil News
Vijayakumar Gavit: 'लोकसभेनंतर ठरवू कुठं जायचं ते'; भाजप मंत्र्यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल; मानहानीचा गुन्हा दाखल करणार

'मी आमदार आहेच, पुढे पण मीच आमदार राहणार, पण माझा सोबत दीपक साळुंखे हेदेखील आमदार होतील,'' असे विधान आमदार शहाजी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगोल्यात केले होते. दीपक साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र, पुन्हा आमदार होणार असं म्हणणाऱ्या शहाजी बापू पाटलांचा सूतगिरणी निवडणुकीत शहाजी बापू पाटलांचा डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी सुपडा साफ केला होता. त्यानंतर शहाजी बापूंनी सांगोल्यात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी यानिमित्ताने पहिला डाव टाकला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com