शहाजीबापू पाटलांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना मराठीसह इंग्रजीतून ऐकविला ‘काय झाडी...’ डायलॉग

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘काय झाडी...’ डायलॉगची आठवण करून दिली. यावेळी मला समोर बोलवून तो डायलॉग पुन्हा म्हणावयास सांगितला.
Eknath Shinde-Shahajibapu Patil-Hemant Biswa Sharma
Eknath Shinde-Shahajibapu Patil-Hemant Biswa SharmaSarkarnama

सांगोला (जि. सोलापूर) :  सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील (Shahajibapu Patil) हे  ‘काय झाडी, काय डोंगार... काय हाटील...एकदम ओके!" डायलॉगमुळे प्रसिद्धीच्या झोकात आले होते. परंतु गुवाहाटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत दर्शनाला गेलेल्या शहाजी बापूंच्या या डायलॉगची भुरळ खुद्द आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही पडली. आसामधील कार्यक्रमातच त्यांनी बापूंना पुन्हा डायलॉग म्हणण्यास सांगितले. त्यावर शहाजीबापूंनीही तो डायलॉग मराठीसह इंग्रजीतही म्हणून दाखविला. (Shahajibapu Patil listened to dialogue 'Kay Zaadi...' in Marathi and English to the Chief Minister of Assam)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिंदे गटातील अनेक मंत्री, आमदार, खासदार गुवाहाटीला गेले होते. या दौऱ्यात त्यांनी कामाख्या देवीचं दर्शनही घेतलं. या दौऱ्यात आमदार शहाजीबापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे गटातील  आमदार, खासदार यांनी गुवाहाटीचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांची भेट घेतली.

Eknath Shinde-Shahajibapu Patil-Hemant Biswa Sharma
‘उद्धव ठाकरेंनी घेतलेली ती शपथ राज ठाकरेंना आजही वेदना देते’

यावेळी आसामच्या मुख्यमंत्र्यानी या जुन्या डायलॉगची आठवण करून दिली. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी आमदार शहाजीबापूंना तो जुना डायलॅाग पुन्हा बोलायला लावला. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्या विनंतीचा मान राखत पुन्हा तो डायलॉग म्हणून दाखविला. विशेष म्हणजे शहाजीबापूंनी त्यांचा डायलॉग मराठी भाषेसह चक्क इंग्रजीत बोलून दाखवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 

Eknath Shinde-Shahajibapu Patil-Hemant Biswa Sharma
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वर्तन म्हणजे केंद्राच्या बिघडलेल्या लाडक्या बाळाप्रमाणे : नीलम गोऱ्हेंनी साधला निशाणा

मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी पाच महिन्यांपूर्वी बंड केले. शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार खासदार राज्यातून सुरतला आणि तेथून गुवाहाटीला होते. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे ठाकरे यांना सोडून शिंदे गटात गेले आणि तेही गुवाहाटीला जाऊन पोहोचले.

Eknath Shinde-Shahajibapu Patil-Hemant Biswa Sharma
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचे शिवसेना नेत्याने सांगितले कारण...

गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांना सांगोल्यातून आलेला एक फोन कॉल प्रचंड व्हायरल झाला. त्या फोन कॉलमधील शहाजीबापू पाटील यांचा एक डायलॉग खूपच प्रसिद्ध झाला. "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओक्के...!" हा डायलॉग प्रचंड व्हायरल झाला, इतकंच काय तर या डायलॉगवर गाणी देखील प्रचंड फेमस झाली आहेत. आमदार शहाजीबापू पाटील जिथं जातील, तिथं हा डायलॉग म्हणण्याची त्यांना विनंती केली जाते आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ‘काय झाडी...’ डायलॉगची आठवण करून दिली. यावेळी मला समोर बोलवून तो डायलॉग पुन्हा म्हणावयास सांगितला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र में कैसा चल रहा है? असा प्रश्न केला, त्यावेळी 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंजी के नेतृत्व में सब कुछ ओके चल रहा है!' असे मी बोलून दाखवले, असेही आमदार शहाजी बापू पाटील यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com