Shambhuraj Desai : देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता शंभूराज देसाई राजीनाम्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Satara Lok Sabha Election Result 2024 : सत्ता माझ्या डोक्यात गेली नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता कशी गेली याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj DesaiSarkarnama

Patan Political News : सातारा लोकसभा निवडणूक निकालात खासदार उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाले आहे. कमी मिळालेल्या मतदानास मी कुणालाही दोष देणार नाही. इथला आमदार म्हणून मी एकटा जबाबदार आहे.

लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून माझ्यासह सरकाऱ्यांना जबाबदारीतून मुक्त करावे. तर आमदार म्हणून काम करण्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी करणार आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास होता, मात्र तो सार्थ करू शकलो नाही, अशी खंत सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

दौलतनगर-मरळी (ता. पाटण) येथे लोकसभा निवडणुकीत निकालाच्या अनुषंगाने आयोजित कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. मंत्री देसाई Shambhuraj Desai म्हणाले, सत्ता माझ्या डोक्यात गेली नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता कशी गेली याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे. देसाई गटाच्या प्रमुखांनी शब्द टाकायचा आणि कार्यकर्त्यांनी यशस्वी करायचा ही देसाई गटाची पद्धत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना पाटणमधून कमी झालेलं मतदान पाहता विधानसभेची निवडणूक असती तर काय निकाल लागला असता, याबाबत विचार करण्याची गरज आहे.

भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या कमी झाली यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जबाबदारी घेतली. तसेच मी कुणालाही दोष देत नाही. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पक्षाचा प्रमुख म्हणून याची जबाबदारी स्वतः घेवून मला मंत्रिमंडळातून उपमुख्यमंत्रीपदातून मुक्त करा आणि पक्ष संघटनेचे मला काम करू द्या, अशी विनंती केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्याच पद्धतीने माझी सुद्धा भूमिका मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडणार आहे.

Shambhuraj Desai
Devendra Fadnavis : शिंदे गटास भाजपनं तारलं ! देवेंद्र फडणवीसांनी नेमकं काय हेरलं ?

खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून उदयनराजे नाही तर, मी उभा आहे असे सांगून मतदान मागितलं होतं. खासदार म्हणून उदयनराजे भोसले निवडून आले. पण, आमदार म्हणून शंभूराज देसाई यांचा पराभव झाला ही खूणगाठ सर्वांनी बांधा. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जसा निर्णय केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर संपला आहे. तसा निर्णय मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Shambhuraj Desai
Kangna Ranaut : कंगनाला मारणाऱ्या 'तिचा' संभाजी ब्रिगेड करणार सत्कार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com